जाहिरात

NCP News: अजित पवारांचा धमाका! 4 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, 'ते' आमदार कोण?

अजित पवारांच्या गटात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा पक्षप्रवेश होईल.

NCP News: अजित पवारांचा धमाका! 4 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, 'ते' आमदार कोण?
सांगली:

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला होता. त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला. त्यांच्या पत्नीला ही बारामतीतून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर अनेकांनी अजित पवारांची साथ सोडली. विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काय स्थिती होणार अशी चर्चा सुरू झाली. पण अजित पवारांनी सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरवले. जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. शिवाय पुन्हा सत्ताते परतले. महत्वाची खाती पदरात पाडून घेतली. स्वत: उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही झाले. त्यानंतर आता अजित पवारांकडे येण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगली जिल्हा तसा काँग्रेस विचारांचा या जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आता या जिल्ह्यातीलच जवळपास 4 माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अजित पवारांची ताकद वाढणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याच जिल्ह्यातील आहे. त्यांनाही हा एक प्रकारचा धक्का मानला जात आहे. जयंत पाटील यांच्या बरोबर रोहित पाटील हे दोघे सध्या शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र या चार माजी आमदारांच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्याचे राजकीय गणीत मात्र बदलणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ; वाहनांनुसार किती टोल भरावा लागणार?

अजित पवारांच्या गटात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख हे दिग्गज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Parbhani News : सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच; न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवाल आला समोर

तशी एक बैठक देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मिरज येथील शासकीय गेस्ट हाऊस मध्ये पार पडली होती. या बैठकीला विलासराव जगताप,अजित घोरपडे,राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक हे उपस्थित होते. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश याबाबत चर्चा देखील पार पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा होऊन, पक्षप्रवेश होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.