रेवती हिंगवे, पुणे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांचे पुण्यात आज तीन कार्यक्रम आहेत यांना ते हजेरी लावतील. अमित शहा यांच्या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाहीत. पुण्यातील अमित शहांच्या कार्यक्रमांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
( नक्की वाचा : राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं )
सकाळी 11 वाजता कोरेगाव पार्क परीसरातील हॅाटेल वेस्टीन येथे पश्चिम विभागीय परीषदच्या बैठकीला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांच्या आणि दादरा नगरहवेली तसेच दिव दमन या केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींची देखील सुरक्षा विषयक बैठक होणार आहे.
( नक्की वाचा : '1999 साली वाजपेयी सरकार मीच पाडलं', शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट )
दुपारी 3 वाजता जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव समारंभ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवतील. हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 5 वाजता बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम आणि निधीचे वितरण कार्यक्रम अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.