Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल

Pune News : वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे

Pune News : पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.  वैष्णवीच्य लग्नात हुंड्यात मागितलेल्या फॉर्च्युनर कारची चावी वैष्णवी आणि तिचा पती शशांक हगवणेच्या हाती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो आता व्हायरल होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही तिच्यावर आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आले.

Ajit Pawar

(नक्की वाचा-  Pune News: 'हे बाळ माझं नाही तर दुसऱ्याचे', वैष्णवी बरोबर त्या घरात भयंकर घडलं, FIR मध्ये धक्कादायक बाबी)

पोस्टमॉर्टेम अहवालात काय? 

वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून, तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांच्यावर खुनाचा आरोप केला आहे. वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक आणि नणंद करिष्मा हगवणे अटकेत आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट प्रश्न विचारले आहेत. संबंधित पदाधिकाऱ्याला ते वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वैष्णवी प्रकरणावर कोणतेही सार्वजनिक विधान केलेले नाही. मात्र, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अजित पवार यांच्यावर न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप न करता निष्पक्ष चौकशी करण्याचा दबाव वाढत आहे.  
 

Topics mentioned in this article