
IPS Jalindar Supekar : महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची कारागृह व सुधारसेवा विभागाच्या महासंचालक पदावरून तडकाफडकी बदली केली आहे. त्यांची नियुक्ती आता उप महासंचालक, गुप्तवार्ता विभाग, राज्य गुप्तवार्ता, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. ही बदली महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 22 नुसार करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुपेकर यांचं पूर्वीचं पद म्हणजे कारागृह व सुधारसेवेचे महासंचालक हे एक महत्त्वाचं प्रशासकीय पद मानलं जातं. मात्र त्यांचं नवीन पद हे तुलनात्मकदृष्ट्या अत्यल्प अधिकार असलेलं आणि विभागीय निर्णय प्रक्रियेत फारसं प्रभावी नसलेलं मानलं जातं. त्यामुळेच ही बदली ‘डाऊनग्रेड' मानली जात आहे.
( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )
गृह विभागाच्या आदेशानुसार ही बदली ‘प्रशासनिक कारणास्तव' करण्यात आल्याचं सांगण्यात आलं असलं तरी पोलीस खात्यात वर्तुळात ही बदली ही शिक्षा म्हणून केल्याची चर्चा आहे. काही वादग्रस्त निर्णय, अंतर्गत मतभेद आणि वरिष्ठ पातळीवरील नाराजीमुळेच सुपेकर यांना दुय्यम पदावर हलवलं गेलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय 30 एप्रिल 2024 पासून तत्काळ प्रभावात आला असून संबंधित आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हगवणे बंधूंना मदत
हगवणे बंधूना खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्र परवाना देण्यात जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा जालिंदर सुपेकर यांची उप महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, येथे तडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world