जाहिरात

Vasai News : वाढदिवसाच्या पार्टीत शुल्लक वादातून तरुणाची हत्या, दोघे गंभीर जखमी

Vasai Crime News: पापडी येथील एका कंपनीत काम करणार्‍या तरुणाचा  वाढदिवस होता. त्यावेळी हे मित्र एका मोकळ्या जागेत पार्टीसाठी बसले होते. ओल्या पार्टीत सर्वच गुंग होते.

Vasai News : वाढदिवसाच्या पार्टीत शुल्लक वादातून तरुणाची हत्या, दोघे गंभीर जखमी

मनोज सातवी, पालघर

Vasai Crime News : वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात वाढदिवसाच्या पार्टीमधे झालेल्या क्षुल्लक वादात एका 30 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आकाश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, मनोज पांडे (37 वर्ष) आणि राहुल भुरकुंड (27 वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पापडी येथील एका कंपनीत काम करणार्‍या तरुणाचा  वाढदिवस होता. त्यावेळी हे मित्र एका मोकळ्या जागेत पार्टीसाठी बसले होते. ओल्या पार्टीत सर्वच गुंग होते. त्यानंतर काही वेळात त्यांच्यात आपसातच क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला. मात्र काही वेळातच किरकोळ भांडणाचे रूपांतर भयानक वादात झाले. 

(ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...)

या मित्रांपैकी मनोज पांडे  याने आकाश पवार आणि राहुल भुरकुंड यांच्यावर आपल्याकडील धारदार चाकूने सपासप वार केले. त्याचवेळी त्या दोघांनीही जखमी अवस्थेत असूनही देखील आरोपी मनोज पांडेवर देखील वार केले. यावेळी झालेल्या रक्तरंजित थरारात तिघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. 

(ट्रेंडिंग बातमी - Praniti Shinde:'खासदार प्रणिती शिंदेंना चपलेने मारा, पळवून लावा' वादग्रस्त वक्तव्य करणारा नेता कोण?)

त्यानंतर जखमींना उपचारासाठी बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आकाश याच्या पोटात चाकूने वार केल्याने तो गंभीर अवस्थेत असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर इतर आरोपी मनोज पांडे आणि राहुल भुरकुंड या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू  आहेत.  उपचारानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com