जाहिरात

Pandharpur News: पंढरपुरात विठ्ठलाचं VIP दर्शन बंद, पण भाजपच्या उमेदवाराने दर्शन रांगेत लढवली मोठी शक्कल

दर्शन रांग थांबवून विधान परिषदेतील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी थेट विठ्ठल दर्शन घेतल्याचं समोर आलं आहे. या व्हिआयपी दर्शनामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Pandharpur News: पंढरपुरात विठ्ठलाचं VIP दर्शन बंद, पण भाजपच्या उमेदवाराने दर्शन रांगेत लढवली मोठी शक्कल
Pandharpur Vitthal VIP Darshan News Today

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी 

Pandharpur Vitthal VIP Darshan News : पुरुषोत्तम अधिकमासाच्या निमित्ताने पंढरपुरात दररोज एक लाख भाविक येत आहेत.अशावेळी सामान्य भाविकांना सहज दर्शन व्हावे यासाठी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.असे जरी असले तरी आज दर्शन रांग थांबवून विधान परिषदेतील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना थेट विठ्ठल दर्शन घडवण्यात आले आहे. त्यामुळे नक्की व्हीआयपी दर्शन पंढरपुरात बंद आहे का?असा सवाल या निमित्ताने पुढे येत आहे. 

पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवल्यामुळे सर्वसामान्य भाविकांची दर्शनाची वेळ तीन तासाने वाढली आहे.त्यामुळे भाविकांना सहज आणि सुलभ वेळेत दर्शन मिळते.अशातच सोलापूर विधान परिषद निवडणुकीमधील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी दर्शन रांगेतील भाविकांना काही क्षणासाठी थांबवण्यात आले होते.

नक्की वाचा >> Pune News: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात बोगस इंटिग्रेटेड कॉलेजचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका

भाविकांना थांबवून राऊत यांना व्हीआयपी दर्शन दिले का?

राऊत यांनी दर्शन घेतले आणि फोटो काढले.सोशल मीडियावर प्रसिद्ध देखील केले.तसेच पंढरपुरात माध्यमांना माहिती देताना आपण विठ्ठल दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केल्याचे देखील राजेंद्र राऊत यांनी सांगितले.त्यामुळे सामान्य भाविकांना थांबवून राऊत यांना व्हीआयपी दर्शन दिले का? अशी चर्चा या निमित्ताने पुढे येत आहे. 

पंढरपुरात विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन पुरुषोत्तम अधिकमासानिमित्त बंद आहे.व्हीआयपी दर्शन बंद असल्याच्या काळात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत,आमदार श्रीकांत भारतीय,खासदार धैर्यशील माने अशा व्हीआयपीने देखील विठ्ठलाचे शिखर दर्शन घेऊन मंदिराच्या व्हीआयपी दर्शन बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

नक्की वाचा >> Does Smartphone Cause Brain Tumor : स्मार्टफोनमुळे ब्रेन ट्यूमर होतो का? काय आहे यामागचं सत्य आणि गैरसमज?

मात्र याच काळात प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी राजेंद्र राऊत आज विठ्ठल मंदिरात पोहोचले होते.विशेष म्हणजे या काळात जिल्हाधिकारी आणि मंदिराचे विश्वस्त ही पंढरपुरात उपस्थित होते.त्यामुळे जिल्हाधिकारी आणि विश्वस्तांच्या निर्णयाला भाजप उमेदवाराने केराची टोपली दाखवली का?असा सवालही या निमित्ताने चर्चेला आला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com