जाहिरात

Walmik Karad: वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीत 31st कसा झाला? वाचा Inside Report

वाल्मिकची आज सीआयडी कसून चौकशी करण्याची शक्यता आहे. त्याच्या चौकशीतून काय बाहेर येतं हे पहावं लागणार आहे.

Walmik Karad: वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीत 31st कसा झाला? वाचा Inside Report
बीड:

वाल्मिक कराड याने पुण्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्याच दिवशी रात्री त्याला केजच्या न्यायालयात सादर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याला 14  दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. कोठडी सुनावल्यानंतर त्याला 31 डिसेंबरची रात्र बीडच्या जेलमध्ये काढावी लागले. ज्या वेळी संपुर्ण देश नवनवर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत होता. त्यावेळी वाल्मिक कराड हा जेलमध्ये होता. ही 31 डिसेंबरची वाल्मिकची रात्र कशी होती याची माहिती आता समोर आली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड याला अटक करावी अशी मागणी होत आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकणात वाल्मिक सीआयडी समोर मंगळवारी पुण्यात शरण आला. त्यानंतर त्याला बीड जिल्ह्यातील केज इथं हलवण्यात आलं. चौकशीनंतर न्यायालयात हजर करून त्याची सीआयडी कोठडी मागण्यात आली. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण याचा एकमेकांशी संबध आहे का याची चौकशी केली जाणार आहे. त्यानुसार न्यायालयानेही 14  दिवसांची सीआयडी कोठडी वाल्मिकला ठोठावण्यात आली. 

ट्रेंडिंग बातमी - Crime news : पत्नीकडून पतीचा छळ, फोनवर जोरदार भांडण, नववर्षाच्या पुर्वसंध्येला भयंकर घडलं

त्यानंतर त्याची रवानगी बीडच्या जेलमध्ये करण्यात आली. जेलमध्ये आल्यानंतर कराडला रात्रीचे जेवण देण्यात आले. त्याने सरकारी जेवण नाकारले. मात्र त्याने त्याची नियमीत औषधं घेतली. त्याला शुगरचा त्रास आहे. त्यामुळे त्याची औषधं त्याने घेतली. रात्री तो बराच वेळी जागाच होता असं सांगितलं जात आहे. त्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास होवू लागला. त्यामुळे त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. शिवाय काही वेळ त्याला ऑक्सिजन ही लावण्यात आलं. रात्रभर तो शांत झोपू शकला नाही.  त्यानंतर सकाळी त्याला उठवण्यात आलं. सरकारी नाश्ता देण्यात आला. मात्र तो घेण्यास त्याने नकार दिला.   

ट्रेंडिंग बातमी - आता खूप झालं... गौतम गंभीरची विराट-रोहितसह संपूर्ण टीमला तंबी, ड्रेसिंग रुममधील धक्कादायक रिपोर्ट

वाल्मिकची आज सीआयडी कसून चौकशी करण्याची शक्यता आहे. त्याच्या चौकशीतून काय बाहेर येतं हे पहावं लागणार आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कुठे गेला. 20 दिवस त्याने काय काय केलं. कुठे लपला होता. त्यावेळी तो कोणाच्या संपर्कात होता. याची माहिती सीआयडी जमा करणार आहेत. शिवाय संतोष देशमुख हत्ये वेळी जे फोन कॉल झाले त्यातील आवाज कोणाचे होते ते ही मॅच केले जाणार आहेत. त्यादृष्टीने सीआयडी आपला तपास करत आहेत. 14 दिवसांची सीआयडी कोठडी मिळाल्याने पुढील 14 दिवस हे वाल्मिकला जेलमध्येच घालवावे लागणार आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com