जाहिरात

Shocking: आली लहर केला कहर! मध्यरात्री दारू पिण्यासाठी दारुड्याची भन्नाट शक्कल, CCTV पाहून सर्वच चक्रावले

या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking: आली लहर केला कहर! मध्यरात्री दारू पिण्यासाठी दारुड्याची भन्नाट शक्कल, CCTV पाहून सर्वच चक्रावले
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात शासनमान्य देशी दारूच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे
  • दारू दुकान बंद झाल्यानंतर एका तळीरामाने भिंतीत छिद्र पाडून चोरी केली
  • चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे कैद झाला असून तब्बल एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
छत्रपती संभाजीनगर:

दारु पिणे हा काही लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दारूचा विषय जरी निघाला तरी असा तळीरामांना हायसं वाटतं. दारू म्हणजेच सर्वस्व आणि दारू म्हणजेच जिवन असं काहीसं या लोकांचं असतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे दारू पिण्याची लहर आल्यानंतर ते कहर केल्या शिवाय राहत नाहीत. त्यासाठी हे तळीराम काही करण्याची तयारी ठेवतात. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. दारू चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर तर सर्वच जण चक्रावले आहेत.  

नक्की वाचा - LSG vs PBKS: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...

 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन परिसरात ही धक्कादायक दारू चोरीची घटना उघडकीस आली आहे. सोमपुरी रोडवर शासनमान्य देशी दारूचे दुकान आहे. या दारुच्या दुकानात मोठ्या प्रमाणात दारूचा साठा होता. शिवाय या दुकानातच अनेक तळीराम येत असतात. मात्र दुकान बंद झाल्यानंतर तिथे कोणी नव्हते. हीच गोष्ट एका तळीरामाने हेरली. काही करून दारू चोरायची असा त्याने प्लॅन केला. पण ते करायचे कसे याचा विचार त्याच्या मनात सुरू होता. त्याच वेळी त्याला एक भन्नाट आयडीया सुटली. 

नक्की वाचा - Tiger attack: वाघ चिडतायत,आक्रमक होतायत! वन्यजीव तज्ज्ञांचे धक्कादायक निरिक्षण, 'त्या' घटनेनंतर चिंता वाढली

त्याने थेट दारू दुकानाच्या भिंतीलाच छिद्र पाडले. त्यातून त्याने देशी दारूच्या दुकानात प्रवेश केला. त्यानंतर तो जणू राजा असल्याच्या आविर्भावात त्या दुकानात वावरू लागला. हे सर्व काही सीसीटीव्ही मध्ये कैद होत होतं. याचं मात्र भान त्याला नव्हतं. दुकानातून त्याने तब्बल 1 लाख 15 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही चोरी करत असताना प्रत्येक क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद होत होता. दारू मालक सकाळी आल्यानंतर त्याला चोरीचा प्रकार लक्षात आला. पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com