- लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश केला होता
- तरुणाला महिलांनी डब्यातून उतरण्यास सांगितले तरीही तो खाली उतरायला तयार नव्हता आणि वाद घालत होता
- या घटनेदरम्यान रेल्वे हेल्पलाइन क्रमांक आणि इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा बंद असल्याचा महिला प्रवाशांनी आरोप केला
लोकल ट्रेनमध्ये रोज काही ना काही होत असतं. तरी जनरल डब्यात पुरूषांचा राडा असतो तर लेडीज डब्ब्यात महिलांचा गोंधळ असतो. कधी जागे वरून तर कधी लोकल ट्रेन पकडण्यावरून हा गोंधळ उडतो. त्याचे व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुकाकूळ घालत आहेत. या व्हिडीओत एक तरूण चक्क लेडी डब्यात चढला. त्याला त्याची चूक दाखवल्यानंतर ही तो डब्यातून खाली उतरण्यास तयार नव्हता. सर्व महिला त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तो काही खाली उतरला नाही.
हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात एका तरुणाने जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. डब्यातील महिलांनी वारंवार सांगूनही तो डब्यातून उतरायला तयार नव्हता. मला वांद्रे येथे उतरायचे आहे असं तो सांगत होता. पण वांद्रे तर कधी गेले असं ही महिला त्याला सांगत होता. पण तो त्यांचे काही ऐकत नव्हता. तो महिलांसोबत वाद घालत होता. त्यामुळे डब्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दारात उभ्या असलेल्या महिला ही आत डब्यात आल्या.
दुसऱ्या बाजूने असलेल्या पुरूष डब्यातून काही जण त्याला खाली उतरण्यास सांगत होते. पण तो त्यांचे ही ऐकत नव्हता. हा प्रकार सुरू असताना रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 1512 आणि डब्यातील इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणाही बंद होती, असा महिला प्रवाशांनी आरोप केला आहे. या प्रकारामुळे मुंबई लोकलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण कुमार आणि त्यांचे पथक कामाला लागेल.
त्यांच्या पथकाने स्थानक परिसर, पादचारी पूल आणि आजूबाजूच्या भागात संबंधीत तरूणाला शोधण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही ही पाहीले गेले. मात्र संबंधित तरुणाचा माग काढण्यात यश आले नाही. तो अचनक गायब झाला. अखेर अनोळखी व्यक्तीविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र अशा घटनांनी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्या तरुणाला सांगून ही तो डब्यातून उतरत नव्हता हे जास्त धोकायदायक होतं. आता हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world