जाहिरात

Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा! प्रवासासाठी आता 7 नवीन स्टेशनचे पर्याय, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Local News : पश्चिम रेल्वे (Western Railway - WR) मार्गावरील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा! प्रवासासाठी आता 7 नवीन स्टेशनचे पर्याय, वाचा संपूर्ण यादी
Mumbai Local News : या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 3,578 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई:

Mumbai Local News : मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वे (Western Railway - WR) मार्गावरील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी दोन वर्षांत विरार-डहाणू मार्गावर 7 नवीन रेल्वे स्टेशन उभी राहणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.

MRVC कडून प्रकल्पाला वेग

मुंबई रेल विकास निगम (MRVC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे आणि हे काम वेगाने पूर्ण केले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, जून 2027 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 3,578 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये 64 किलोमीटर लांबीच्या विरार-डहाणू रेल्वे खंडाचे चौपदरीकरण (Quadupling) करणे देखील समाविष्ट आहे.

( नक्की वाचा : Mumbai Local : मध्य रेल्वेचा मोठा दिलासा! दोन नवी स्टेशन आणि 20 अतिरिक्त लोकल लवकरच सेवेत, वाचा संपूर्ण प्लॅन )
 

विरार-डहाणू मार्गावर ‘या' 7 नवीन स्टेशनची भर

सध्या विरार-डहाणू मार्गावर फक्त 9 स्टेशन कार्यरत आहेत. यामध्ये विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोली, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड या स्टेशनचा समावेश आहे.

प्रवाशांची वाढती संख्या आणि दीर्घकाळापासून होत असलेल्या नवीन थांब्यांच्या मागणीमुळे या मार्गावर आणखी 7 नवीन स्टेशन जोडली जात आहेत.

विरार-डहाणू मार्गावर सुरू होणाऱ्या नवीन 7 स्टेशनची नावे खालीलप्रमाणे आहेत:

वाधीव (Wadhiv)

सरतोडी (Sartodi)

माकूणसर (Makunsar)

चिंतुपाडा (Chintupada)

पांचाली (Panchali)

वांजरवाडा (Vanjarwada)

बीएसईएस कॉलनी (BSES Colony)

सध्या विरार रेल्वे मार्गावर दररोज सुमारे 5.8 लाख प्रवासी प्रवास करतात, तर डहाणू येथून सुमारे 2.6 लाख नागरिक ये-जा करतात. तसेच, वैतरणा आणि बोईसरसारख्या लहान स्टेशनवरूनही हजारो लोक रोजचा प्रवास करतात. नवीन स्टेशनमुळे या संपूर्ण विभागातील प्रवासाचा ताण कमी होण्यास मदत होईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com