Water Shortage News : राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावागावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 384 गावं आणि वाड्यांवर 478 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या आठवड्यात हा आकडा 223 होता. मात्र आठवड्याभरात 250 पेक्षा अधिक टँकर वाढले आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने अनेक छोटे-मोठे तलावांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तर ग्रामीण भागांमधील विहिरी आणि बोरवेलचे पाणी देखील अटले आहे. त्यामुळे अनेक भागात पिण्यासाठी पाणीच नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
( नक्की वाचा : ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव )
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर?
- ठाणे - 36 टँकर
- रायगड - 21 टँकर
- पालघर - 17 टँकर
- नाशिक - 22 टँकर
- अहिल्यानगर - 56 टँकर
- पुणे - 31 टँकर
- सातारा - 55 टँकर
- सांगली - 02 टँकर
- सोलापूर - 05 टँकर
- छत्रपती संभाजीनगर - 135 टँकर
- जालना - 46 टँकर
- नांदेड - 02 टँकर
- अमरावती - 12 टँकर
- वाशीम - 01
- बुलढाणा - 28 टँकर
- यवतमाळ - 08 टँकर