जाहिरात

Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी म्हणजेच 22 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्थानकांसह 103 अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत.

Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन
मुंबई:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी म्हणजेच 22 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्थानकांसह 103 अमृत स्थानकांचे (Amrit Station) उद्घाटन करणार आहेत.  रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, देशभरातील 1309 स्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 6 ऑगस्ट 2023 मध्ये आणि नंतर 26 फेब्रुवारी 2024 रोजी अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी  केली होती. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांना दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकात्मिकीकरण, दिव्यांगजनांसाठी वाढीव सुविधा, शाश्वततेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकामध्ये परावर्तीत करण्यावर भर दिला गेला आहे.

आता या योजनेअंतर्गतचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, गुरुवारी म्हणजेच 22 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेच्या 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहे. यात महाराष्ट्रातील 15 प्रमुख रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. ही स्थानके अत्याधुनिक प्रवासी  अनुकूल सुविधांनी अद्ययावत करण्यात आली, या सगळ्यासाठी एकत्रितपणे 175 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला आहे.

( नक्की वाचा : Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग )

राज्यातील कोणत्या रेल्वे स्टेशनचा समावेश?

महाराष्ट्रातील या 15 रेल्वे स्टेशनमध्ये  परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, देवळाली, धुळे, सावदा, चंदा फोर्ट, एनएससीबी इटवारी जंक्शन, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com