
Western Railway News : लोकल सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. रोज लाखो मुंबईकर कामानिमित्तानं लोकलमधून प्रवास करत असतात. वेस्टर्न, सेंटर आणि हार्बर या तीन मार्गांप्रमाणेच ट्रान्स हार्बरनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची ही गरज लक्षात घेऊन या मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्यात येत आहे. त्याचबरोबर वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेवर एसी लोकलही सुरु करण्यात आल्या आहेत. या एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन प्रवाशाच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेनं 13 नव्या एसी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारपासून (27 नोव्हेंबर, 2024) या एसी लोकल सुरु होणार आहेत.
वेस्टर्न रेल्वेनं एक्स या सोशल मीडिया नेटवर्कवरुन ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. वाढती लोकप्रियता आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं (WR) उपनगरीय AC लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार 27 नोव्हेंबरपासून या लोकल सुरु होतील, अशी माहिती या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
( नक्की वाचा : मुंबईत झाली सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट? 1 महिना वॉट्सअप कॉलवर ठेवलं LIVE अन् लुटले तब्बल... )
वेस्टर्न रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार 12 नॉन एसी लोकलचं एसी लोकलमध्ये रुपांतर करण्यात येत आहे. या एसी लोकल आठवड्यातील सातही दिवस सुरु असतील. लोकलच्या एकूण फेऱ्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. वेस्टर्न रेल्वेवर दिवसभर 1406 रेल्वेच्या एकूण फेऱ्या होणार असून त्यामध्ये एसी लोकलच्या फेऱ्यांची संख्या 109 आहे.
या नव्या एसी लोकलच्या फेऱ्यांची सुरुवात बुधवार 27 नोव्हेंबरपासून सुरु होईल. चर्चगेटपासून दुपारी 12 वाजून 34 मिनिटांनी यामधील पहिली लोकल धावेल. त्यानंतर या एसी लोकल त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती वेस्टर्न रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात करण्यात आली आहे.
नव्या AC लोकलचं वेळापत्रक पाहा
Looking at the popularity and growing demand by the commuters, WR has decided to increase the number of AC local services over Mumbai Suburban section with effect from Wednesday, 27th November, 2024.#WRUpdates pic.twitter.com/4YtDwnvCMY
— Western Railway (@WesternRly) November 26, 2024
या 13 नव्या एसी लोकलपैकी 6 अप मार्गावर तर 7 डाऊन मार्गावर धावणार आहेत. विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेट अप मार्गावर प्रत्येकी 2 तर विरार-वांद्रे आणि भाईंदर-अंधेरी मार्गावर प्रत्येकी 1 लोकल धावेल. तर डाऊन मार्गावर चर्चगेट-विरार मार्गावर दोन तर चर्चगेट-भाईंदर, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर,महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदर मार्गावर प्रत्येकी एक रेल्वे धावणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world