जाहिरात

Nalasopara Station : प्रवाशांनी लक्ष द्या! आता नालासोपारा स्टेशनवर लोकलमध्ये चढण्यापूर्वी ही गोष्ट अनिवार्य

उपनगरीय ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

Nalasopara Station : प्रवाशांनी लक्ष द्या! आता नालासोपारा स्टेशनवर लोकलमध्ये चढण्यापूर्वी ही गोष्ट अनिवार्य

Mumbai Local Rules : पश्चिम रेल्वेने नालासोपारा रेल्वे स्टेशनवर कार्यालयीने वेळेतील वाढल्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष गर्दी व्यवस्थापन अभियान सुरू केलं आहे. उपनगरीय ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरारचे सहाय्यक सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानाअंतर्गत प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना व्यवस्थितपणे रांगेत उभं राहण्यासाठी प्रेरित केलं जात आहे. 


प्रवाशांना दिली जात आहे माहिती...

ट्रेन येण्यापूर्वीच नियमित उद्घोषणा दिल्या जात आहेत. यानुसार, पहिल्यांदा उतरणाऱ्या प्रवाशांना जागा द्यावी आणि त्यानंतर रांगेत लोकलमध्ये चढावे असं सांगितलं जात आहे. यामुळे धक्का-बुक्की आणि गोंधळ रोखण्यास मदत मिळत आहे. सध्या याची सुरुवात पायलट प्रोजेक्टच्या आधारावर नालासोपाऱ्यातून सुरू करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य स्टेशवरही हा लागू केला जाईल. कार्यालयीने वेळेत नालासोपाऱ्याहून अधिक लोक गर्दीच्या वेळी विरार डाऊन प्रवास करतात. सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आरपीएफ आणि एमएसएफच्या जवानांची संयुक्त टीम तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रांगेत उभं राहून लोकलमध्ये चढावं लागणार आहे, ही बाब अनिवार्य असेल. 

नक्की वाचा - Navi Mumbai : 'पोलीस ठाण्यात गेलास तर खल्लास'; भररस्त्यात तरुणाला बेदम मारहाण, स्थानिकांमध्ये घबराट

प्लॅटफॉर्मवर शिस्तीचं पालन...

सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नालासोपारा पोस्टची टीमदेखील सक्रियपणे ड्यूटीवर उपस्थित आहेत. अधिकारी प्रवाशांसोबत वैयक्तिक संवाद करीत त्यांना नियमांचं पालन करण्यासाठी जागरुक करीत आहेत. या प्रयोगामुळे  प्लॅटफॉर्मवरील शिस्त वाढेल आणि प्रवाशांची सुरक्षितता राखली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com