जाहिरात

'रेनकोट'मुळे रखडली पश्चिम रेल्वेची वाहतूक; चर्चगेट स्थानकात नेमकं काय झालं? 

सुमित भाग्यवंत नावाचा 19 वर्षीय तरुण पश्चिम रेल्वेने प्रवास करत होता. चर्चगेट रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुमितने प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असलेल्या मित्राला रेनकोट देण्याचा प्रयत्न केला.

'रेनकोट'मुळे रखडली पश्चिम रेल्वेची वाहतूक; चर्चगेट स्थानकात नेमकं काय झालं? 

मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल ट्रेन आज एका विचित्र कारणामुले खोळंबली होती. एका रेनकोटमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचा प्रकार सोमवारी (23 जुलै)  घडला. तरुणाने फेकलेला रेनकोट ओव्हरहेड वायरवर अडल्याने काही वेळ रेल्वेचा वाहतूक थांबली होती. या तरुणावर आता रेल्वे पोलिसांना कारवाई केली आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुमित भाग्यवंत नावाचा 19 वर्षीय तरुण पश्चिम रेल्वेने प्रवास करत होता. चर्चगेट रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून सुमितने प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर असलेल्या मित्राला रेनकोट देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमितने फेकलेला रेनकोट थेट ओव्हरहेड वायरवर जाऊन अडकला. दुपारी 3.10 मिनिटांनी घडलेल्या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेची सेवा 25 मिनिटे रखडली होती. 

(नक्की वाचा- Finance Sector Job : देशात 18 लाख नोकऱ्या उपलब्ध, मात्र योग्य उमेदवारच नाहीत)

चर्चगेट स्थानकात घडलेल्या घटनेचा VIDEO

RPF जवानांचे शर्थीचे प्रयत्न करुन वायरवर पडलेला  रेनकोट काही मिनिटात काढला. मात्र यामुळे पश्चिम रेल्वेच्या विरारच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. जवळपास 10 ते 15 मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. 

(नक्की वाचा - मुंबईत ठाकरे गटाचा धक्का, 4 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार)

या प्रकरणी आरपीएफने आता सुमित भाग्यवंत या तरुणावर कारवाई केली आहे. आरपीएफने रेल्वे ॲक्ट 174(क) अंतर्गत कारवाई केली आहे. तरुणाला दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
'रेनकोट'मुळे रखडली पश्चिम रेल्वेची वाहतूक; चर्चगेट स्थानकात नेमकं काय झालं? 
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट