गुरु दळवी, सिंधुदुर्ग
मुंबईतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चार माजी नगरसेवक एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामध्ये भास्कर खुरसंगे, रिद्धी खुरसंगे,
संजय शिंगण, गीता शिंगण यांचा समावेश आहे. आपण विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं या चार माजी नगरसेवकांनी सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईच्या माजी महापौर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज त्या माजी नगरसेवकांवर टीकास्त्र सोडलंय. किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, मुळातच विकास कामांसाठी लागणारा निधी हा उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेवकांना मिळतच नाही.
(नक्की वाचा- विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईबाबत काँग्रेस बॅकफूटवर?)
पक्ष सोडणारे माजी चार नगरसेवक शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत हे राष्ट्रवादीतून प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून शिवसेनेत आले होते. नगरसेवकांचं काम चांगलं होतं. परंतु, आर्थिक गळचेपी म्हणजेच विकासनिधी मिळत नसल्याचे कारण सांगून पक्ष सोडणे आश्चर्यकारक आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
(नक्की वाचा - Exclusive - काँग्रेसच्या 5 आमदारांवर कारवाई निश्चित, मात्र दोन आमदारांवर मेहरबानी?)
पक्ष सोडणाऱ्यांना कोणीही अडवू शकत नाही, ज्याची-त्याची मर्जी असते. महायुती सरकारकडून ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील नगरसेवकांना कुठल्याही प्रकारचा निधी दिला जात नाही हे सत्य आहे. ही गळचेपी असून ती जोरात सुरू आहे. त्यामुळे हे लोक अशाप्रकारचे निर्णय घेत असतील. निधी मिळत नसल्याने शिंदे शिवसेनेत गेलो ते अर्धसत्य आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world