जाहिरात

शाळांची वेळ कितीची? शिक्षण मंत्री आता नेमके काय म्हणाले?

सकाळी 9 वाजता शाळा सुरू करण्याचा आदेश सरकारचा होता. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच शांळांनी सरकारच्या यानिर्णयाला केराची टोपली दाखवली.

शाळांची वेळ कितीची? शिक्षण मंत्री आता नेमके काय म्हणाले?
मुंबई:

नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेची वेळ सकाळी 9 ची असावी असे परिपत्रक राज्य सरकारने काढले होते. मात्र या परिपत्रकाला सर्व शाळांची केराची टोपली दाखवली. शाळा सकाळी सात वाजताच उघडल्या गेल्या. बदलत्या राहणीमाना नुसार लहान मुलांची झोप पुर्ण होत नाही. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा बदलण्याच्या सुचना शाळांना केल्या होत्या. पण त्या कोणीही गांभिर्याने घेतल्या नाहीत.त्यामुळे आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.  

केसरकरांचा इशारा 

सकाळी 9 वाजता शाळा सुरू करण्याचा आदेश सरकारचा होता. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच शांळांनी सरकारच्या यानिर्णयाला केराची टोपली दाखवली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शाळांनी जर सुचनांची अमंलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. शाळांना सकाळा शाळा सुरू करण्यात काय अडचण आहे हे तरी त्यांनी आम्हाला सांगावे असेही ते म्हणाले. सरकारला शाळा आणि शिक्षण संस्थांनी गृहीत धरू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. 

'...तर विचार करावा लागेल' 

सरकारला ही अनेक नियमावंर बोट ठेवता येते. शाळांच्या नाड्या या सरकारच्या हाता आहेत हेही शाळा आणि संस्थांनी लक्षात ठेवावे. शाळांची फी आकारणी असो की नियमांची अंमलबजावणी असो प्रत्येक गोष्टीत सरकारला आता काटोकोर लक्ष घालावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.  त्यामुळे अडचणी काय आहे याची चर्चा सरकार बरोबर करावी असेही ते म्हणाले. शिवाय नऊ वाजता शाळा सुरू न झाल्यास होणाऱ्या कारवाईला तयार रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र शाळांच्या वेळा नक्की कितीच्या असणार हे अजूनही अधांतरीच आहे. शाळांनी ठरवलेला वेळ आणि सरकारने सांगितलेला वेळ यांचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे.  

शाळांची मनमानी 

सरकारने सकाळी 9 वाजताचे परिपत्रक काढले  होते. त्यामुळे लहान मुलांना थोडा दिलासा मिळाला होता. पण शाळेच्या पहिल्याच दिवशी जवळपास सर्वच शाळांनी शाळेची वेळ काही बदलली नाही. नर्सरीची मुलेही सकाळी सात साडेसातला शाळेत हजर होती. आताही सरकार कारवाईची भाषा करत आहे. असे असले तरी चर्चेला या, तुमच्या अडचणी सांगा असेही सरकारकडून सांगितले जात आहे. त्यामुळे एकीकडे नियम केले जात आहेत तर दुसरीकडे पळवाट ही दिली जातेय. त्यामुळे पुढच्या काळात शाळेची वेळ नक्की काय असणार या बाबत संभ्रम आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com