What is AB Form : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधासभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र निवडणुकीदरम्यान तुमच्या कानावर एबी फॉर्मबाबत सातत्याने ऐकू येत असेल. तर हा एबी फॉर्म उमेदवारांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? निवडणुकीदरम्यान या एबी फॉर्मला इतकं महत्त्व दिलं जातं? ‘एबी' फॉर्म म्हणजे काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
नक्की वाचा: शिवसेना ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, 'या' मुस्लीम उमेदवाराला संधी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार लोकसभा किंवा विधानसभेत एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्याची खाजगी माहिती, त्याचबरोबर तो कोणत्या पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे याची विस्तृत माहिती सर्वप्रथम निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यासाठी उमेदवाराला स्वतंत्र दोन फॉर्म भरणं अनिवार्य आहे. यामध्ये पहिला फॉर्म म्हणजे, फॉर्म A आणि दुसरा म्हणजे फॉर्म B. या दोन्ही फॉर्म्सना एकत्रितपणे AB फॉर्म असं म्हटलं जातं.
विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी या फॉर्मला AA फॉर्म आणि BB फॉर्म असं बोललं जातं. उमेदवाराला पक्षाकडून एबी फॉर्म दिला असेल तर तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. त्याचबरोबर त्याला पक्षाशी संबंधित अधिकृत चिन्हही दिले जाते.
नक्की वाचा: राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
'ए' फॉर्म म्हणजे काय?
उमेदवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला ए फॉर्म हा भरावाच लागतो. मान्याताप्राप्त राष्ट्रीय किंवा प्रादेशिक राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची ओळख पटवणारा ही ए फॉर्मद्वारे होते. या फॉर्मवर पक्षाचा अधिकृत शिक्का व तिकीट वाटपासाठी पक्षाने नेमलेल्या प्रमुख व्यक्तीची स्वाक्षरी असते. त्याचबरोबर यात पक्षातील अर्ज भरणाऱ्या व्यक्तीचे नाव, पक्षाचे चिन्ह, पक्षातील पद या सर्व गोष्टी नमूद असतात.
'बी' फॉर्म म्हणजे काय?
फॉर्म बी हा पक्षाच्या पर्यायी उमेदवारासाठी असतो. फॉर्म बी सुद्धा राजकीय पक्षांकडून जाहीर झालेल्या उमेदवाराचे नाव व फॉर्म ए प्रमाणेच संपूर्ण माहिती असलेला फॉर्म असतो. पण फॉर्म बीमध्ये फॉर्म ए व्यतिरिक्त आणखी एका उमेदवाराचेही नाव असते. जर काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर, ऐनवेळी पर्याय म्हणून या दुसऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोग अधिकृत उमेदवार म्हणून निवडू शकतो.