KDMC News: अनाकलनीय! महायुतीला स्पष्ट बहुमत; मग शिवसेनेने मनसेचा पाठिंबा का घेतला? वाचा Inside Story

KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या निकालानंतर आता शिवसेनेने 53 नगरसेवकांचा आपला अधिकृत गट स्थापन केला आहे. तर मनसेच्या 5 नगरसेवकांनी देखील शिवसेनेला पाठिंबाव दर्शवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजप महायुतीने एकत्र लढली आणि एकतर्फी बाजी देखील मारली. मात्र निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचं राजकारण डोकं चक्रावणारं आहे. केडीएमसीमध्ये 122 नगरसेवक असून एकट्या शिवसेना-भाजप महायुतीचे येथे 103 नगरसेवक निवडणूक आले आहे. महायुतीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा असताना देखील मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा घेणे, ठाकरेंचे नगरसेवक सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणे अशा घडामोडी कल्याण-डोंबिवली महापालिकेत घडल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊयात. 

शिवसेनेने मनसेचा पाठिंबा का घेतला? 

लोकसत्ताचे एमएमआर ब्युरो हेड जयेश सामंत यांनी याबाबत विश्लेषण करताना सांगितलं की, "भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या पट्ट्यात जो काही संघर्ष सुरु आहे, त्याचा हा परिणाम आहे. महापौर महायुतीचाच होईल असं श्रीकांत शिंदे ज्यावेळी म्हणतात, तेव्हा 100 जास्त असलेल्या महायुतीचा महापौर सरळ बसवता आला असता. मात्र असं न करता भाजप पेक्षा आपला पक्ष कसा वरचढ आहे, यातून श्रीकांत शिंदे यांनी हे सगळं नवीन गणित जुळवून आणलं आहे." 

"निवडणुकीआधीची युती पाहता नव्या समीकरणांच्या जुळवाजुळवीची आवश्यकताच नव्हती. मात्र ज्यावेळी मनसेचे नगरसेवक सोबत घेणे किंवा ठाकरे-काँग्रेसच्या नगरसेवकांना गळ घातली जाते तेव्हा आपण भाजप किती वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. राक्षसी बहुमत महायुतीकडे असतानाही महायुतीतील हे पक्ष विशेषत: शिंदे आपली चूल स्वतंत्र मांडण्याची प्रयत्न करतात, यावरून हे मित्रपक्ष आतून किती दुरावले गेलेत हे दिसतं", असं देखील जयेश सामंत यांनी सांगितलं.  

(नक्की वाचा- KDMC News: कल्याण-डोंबिवलीत शिंदेंची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंना सॉलिड धक्का)

मनसेचा शिवसेनेला पाठिंबा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या निकालानंतर आता शिवसेनेने 53 नगरसेवकांचा आपला अधिकृत गट स्थापन केला आहे. तर मनसेच्या 5 नगरसेवकांनी देखील शिवसेनेला पाठिंबाव दर्शवला आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे.

Advertisement

महापौर महायुतीचाच असेल- श्रीकांत शिंदे

कल्याण-डोंबिवली असो अथवा उल्हासनगर महायुतीचाच महापौर बसेल. भाजपला बाजूला ठेवून काहीतरी होईल, तर तसे अजिबात होणार नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुती आणि मनसे मिळून सत्ता स्थापन करू. उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना, भाजप, वंचितने आधीच समर्थन दिलं आहे, साई पार्टी आणि अपक्ष मिळून सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी ठाकरेंच्या नगरसेवकांना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनीही द्यावा, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. महापौर, उपमहापौर आणि समितीच्या अध्यक्षपदासंदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण मिळून घेतील, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article