ST कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन का हवंय? दोन्हींच्या पगारातील तफावत किती?

एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या शासकीय वाहन चालकासी तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.  

Advertisement
Read Time: 2 mins

संजय तिवारी, एनडीटीव्ही

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी संपकऱ्यांची आहे. एसटी कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी यांना मिळणाऱ्या पगारातील तफावतीमुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही संप केला होता. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एसटी कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारातील तफावत

एसटी बस चालक आणि वाहक यांच्यावर बसमधील प्रवाशांची जबाबदारी असते. याशिवाय बस हे अवजड वाहन आहे, त्यामुळे ते चालवणे जास्त आव्हानात्मक आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालकांच्या पगारीची तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.  

( नक्की वाचा : ST Bus Strike : लाल परी थांबली, प्रवाशांचे हाल; तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती? )

एसटी कर्मचारी आणि शासकीय वाहन चालक दोघांना समान दर्जा दिलेला नाही. मंत्र्यांचे किंवा मोठ्या अधिकाऱ्याचे शासकीय वाहन चालवण्यासाठी किमान 10 वर्षांचा अनुभव असावा लागतो. या चालकाला 50 ते 55 हजार रुपये महिन्याला पगार मिळतो. त्याशिवाय भत्ते असतात. सर्व मिळून त्यांच्या हाती महिन्याला सुमारे 75 हजार रुपये पगार मिळतो. मात्र अनेक प्रवाशांची जबाबदारी असलेल्या एसटी महामंडळाच्या बस चालकाला अवघा 24 हजार रूपये मिळतो. 

शासकीय चालकाला शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के पेन्शन मिळते. आता सेवानिवृत्त झालेल्या एसटी बस चालकाला 4 हजार रुपये पेन्शन मिळते. तर जुन्या सेवानिवृत्त झालेल्या एसटी बस चालकाला एक किंवा 2 हजार रुपये पेन्शन मिळते. हीच एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : ST Bus Strike : लाल परी थांबली, प्रवाशांचे हाल; तुमच्या जिल्ह्यात काय आहे परिस्थिती? )

काय आहेत एसटी कर्मचारी संघटनांच्या मागण्या? 

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे.
  • कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळणेबाबत
  • घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी
  • 2015-2020 या कालावधीसाठी जाहीर केलेल्या रुपये 4849 कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी
  • सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट 5000 रुपयांची वाढ करावी
  • आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्यात व स्वमालकीच्या एस.टी. बसेस उपलब्ध करून द्याव्यात. तसेच मनुष्य बळही उपलब्ध करून द्यावे.