
Bangalore Wife Murder case : पत्नीची बंगळुरूमध्ये हत्या करून तिचा मृतदेह सूटकेस ठेवून फरार झालेल्या आरोपी राकेश खेडकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी पतीने आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केल्याचं आढळून आलं. राकेश खेडेकरवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बंगळुरुतून निघालेला राकेश खेडेकर हा पुणे आणि साताऱ्याच्या हद्दीवर असणाऱ्या शिरवळ येथे पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी आणले त्यावेळी त्याने विष प्राशन केल्याचं आढळून आले. आरोपीची प्रकृती स्थिर असल्याचं ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.
बंगळुरूत असताना आरोपीने घरी फोन करुन वडिलांना घडलेला प्रकार सांगितला होता. तसेच मी देखील आत्महत्या करत असल्याचे वडील राजेंद्र खेडेकर यांना सांगितले होते. मात्र वडिलांना समजावून त्याला मुंबईत बोलावून घेतलं.
(नक्की वाचा- Crime News : पत्नीची हत्या केली अन् मृतदेह सूटकेसमध्ये भरला; पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक)
राकेश खेडेकर यांनी याबाबत सांगितल की, "घटनेनंतर मुलाने मला फोन केला होता. बायको (गौरी) रोज माझ्याशी भांडण करते, म्हणून रागाच्या भरात मी असं केलं. याबाबत त्याने दोन-चार दिवसांपूर्वी त्याने बायकोच्या आईलाही फोन केला होता. बायको खूप त्रास असं सांगितलं होतं. त्यानंतर तिच्या आईनेही तिला समजावले होते. तिची आई माझी सख्खी बहीण आहे. जोगेश्वरी येथे असानाही तिने आम्हाला खूप त्रास दिला होता."
"राकेशने मला रात्री फोन केला होता. रात्री तो निघाला आणि त्याने सोबत विषाची बाटली घेतली होती. मी देखील आत्महत्या करणार आहे, असं तो म्हणाला. याबाबत बायकोच्या घरच्यांना सांगा, असेही त्याने सांगितले. मी त्याला बंगळुरूहून इकडे यायला सांगितले आणि जोगेश्वरी पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली," असं राजेंद्र खेडेकर यांनी सांगितलं.
(ट्रेंडिंग बातमी- Crime News : हात-पाय मोडले, अंगावर चटके दिले; दत्तक घेतलेल्या चिमुकलीची छळ करुन हत्या)
खेडेकर यांनी पुढे सांगितलं की, "मुलाची बायको रोजच भांडण करायची. तिने त्याच्या भावालाही मारहाण केली होती. लग्नाच्या आधी आम्हाली तिच्याबद्दल माहिती होती. आमचा या लग्नाला विरोध होता. आम्ही या लग्नाला चार वर्ष विरोध केला. मात्र दोघांनी हट्ट करुन हे लग्न केले."
काय आहे प्रकरण?
आरोपी राकेश खेडेकरने पत्नी गौरी सांबरेकर क्षुल्लक वादातून हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतदेह सूटकेसमध्ये ठेवला होता. बंगळुरूतील दोड्डाकम्मनहल्ली येथे ही घटना घडली. महिनाभरापूर्वीच बंगळूरुतील या घरात ते राहायला गेले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world