Pimpri Chinchwad: बायकोला नगरसेवक बनवायचे होते, तिनेच घात केला; नवऱ्याची गळा आवळून हत्या, कारण...

Pimpri Chinchwad News: मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी चिंचवड

पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे 3 वाजेच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. चिडलेल्या पत्नीने पती नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला.

(नक्की वाचा-  Satara News: "माझ्यावर अन्याय होत आहे...", साताऱ्यात महिला डॉक्टरची आत्महत्या)

या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहेत. पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे लहान मुलांवर मोठे संकट आले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा- Pune News: NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन आठवड्यात दुसरी घटना, खळबळ)

मृत नकुल भोईरचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा. अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते. सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते. यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला निवडणुकीत उभे देखील करणार होता. मात्र त्याआधीच संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.

Advertisement

Topics mentioned in this article