
मुंबईवर 26 नोहेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्यात पोलीस शिपाई अंबादास पवार यांना वीर मरण आले होते. त्यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पवार यांना पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. या निर्णयानंतर कल्पना पवार यांनी समाधान व्यक्त करत, आपली ही देशसेवा करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी सतत सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. राज्यातीला सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे व राज्यातील महिलांचे लाडके भाऊ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद पोलीस यांच्या पत्नीस थेट पोलीस उपअधीक्षक पदावरील नियुक्तीचे आदेश दिले आहे. त्यांची शहीदांप्रति असलेली संवेदनशीलता दिसून आली आहे, अशी भावना पवार यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानताना व्यक्त केली आहे.
शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 22, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस… pic.twitter.com/MHM4k8sKAr
माझ्या पती प्रमाणेच मलाही देशसेवा करण्याची संधी दिली आहे असंही कल्पना पवार म्हणाल्या. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान दिलेल्या शहीद वीरांचे आहे. हे माझ्या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितले. कल्पना यांचे पती 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world