जाहिरात

PM नरेंद्र मोदींकडे जातीय जनगणनेची मागणी करणार : छगन भुजबळ

ओबीसीमधून मराठा समाजला आरक्षण नाही यावर मी ठाम आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. येत्या 5-6 दिवसात समता परिषदेची बैठक बोलावणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलं. 

PM नरेंद्र मोदींकडे जातीय जनगणनेची मागणी करणार : छगन भुजबळ
मुंबई:

राज्यस्तरीय समता परिषदेची महत्त्वाची बैठक आज पार पडली. छगन भुजबळ यांनी ही बैठका बोलावली होती. मराठा, ओबीसी आरक्षणासह बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत अॅड. मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबतही चर्चा झाली.

ओबीसीमधून मराठा समाजला आरक्षण नाही यावर ठाम आहे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. येत्या 5-6 दिवसात समता परिषदेची बैठक बोलावणार असल्याचंही भुजबळांनी सांगितलं. 

(नक्की वाचा- भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार? लोकसभेतील पराभवाचा कुणाला फटका बसणार?)

बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, समता परिषदेच्या बैठकीत सध्याची राजकीय स्थितीवर चर्चा झाली. कोण कोण जिंकले, जे पराभव झाले ते का झाले याची माहिती घेतली. यासोबतच नितीश कुमार यांनी जातीय जनगणना करावी अशी भूमिका मांडली आहे. आम्ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातीय जनगणनेची मागणी करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

जातीय जनगणना झाली तर ओबीसी नेमके किती आहेत हे समजेल. जनगणना झाली तर खरा हिशोब बाहेर येईल. ओबीसींच्या परिस्थितीबाबतची माहिती मिळेल. जातीय जनगणना झाली तर केंद्र सरकारकडून मिळणारा निधी देखील ओबीसी समाजाला मिळेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा - लोकसभा पराभवानंतर भाजपचा अ‍ॅक्शन प्लान तयार, 'या' नेत्यांवर मोठी जबाबदारी)

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं लेखी हमी द्यावी, या मागणीसाठी मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. ओबीसींवर अन्याय होतील अशा गोष्टींवर चर्चा करणार आहे. त्यामुळे त्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. सरकारकडून अन्याय होत असेल तर मी ओबीसी समाजासोबत असेल, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com