पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यात भारत-इस्रायल मैत्रीचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अनोखे दर्शन घडले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी चक्क भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वांना चकित केले. या 'डिप्लोमसी विथ अ पर्सनल टच'मुळे या दौऱ्याची जगभरात चर्चा सुरू आहे.
बुधवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या विशेष मेजवानीच्या वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी चक्क भारतीय 'मोदी जॅकेट' परिधान केले होते. आपल्या मित्राच्या सन्मानार्थ त्यांनी केलेला हा पेहराव भारत-इस्रायल मैत्रीचे प्रतीक मानला जात आहे.
पाहा VIDEO
हमारे संयुक्त रात्रिभोज से पहले, मैंने अपने मित्र प्रधानमंत्री मोदी को पारंपरिक भारतीय परिधान पहनकर चौंका दिया। 🇮🇱🇮🇳@narendramodi pic.twitter.com/3ElIQeLY97
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) February 25, 2026
(नक्की वाचा- Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)
"मित्राला दिलेले सरप्राईज"
नेतन्याहू यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. "आमच्या संयुक्त भोजनापूर्वी, मी माझे मित्र पंतप्रधान मोदींना पारंपरिक भारतीय पेहराव परिधान करून चकित केले," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि काही काळ अनौपचारिक गप्पा मारल्या.
(नक्की वाचा- Kalyan News: "आई-बाबा त्रास करुन घेऊ नका..." बारावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सुसाईड नोटही सापडली)
भगवा रंग आणि 'मॅचिंग'ची चर्चा
दौऱ्याच्या पहिल्या दिवशीही अशाच एका खुशनुमा क्षणाने सर्वांचे लक्ष वेधले होते. पंतप्रधान मोदींचे विमान उतरताच नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी सारा यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. सारा नेतन्याहू यांनी भगव्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता. यावर नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींच्या जॅकेटवरील 'पॉकेट स्क्वेअर'कडे (खिशातील रुमाल) इशारा करत म्हटले की, "हा रंग तुमच्या पॉकेट स्क्वेअरशी मॅच होत आहे." या मिश्किल टिप्पणीवर दोन्ही नेत्यांनी जोरदार हसून दाद दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world