जाहिरात

Pune News: पोलीस असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार, धक्कादायक घटनेनं देऊळगाव हादरले

पुणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत.

Pune News: पोलीस असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार, धक्कादायक घटनेनं देऊळगाव हादरले
पुणे:

देवा राखुंडे 

गेल्या काही दिवसापासून पुणे आणि पुणे जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना या वाढलेल्या दिसत आहेत. त्या कमी होण्याचं सध्या तरी नाव नाही. त्यात आता आणखी एका दुर्दैवी घटनेची भर पडली आहे. एका महिलेला आपण पोलिस असल्याची बतावणी करत आरोपीने तिच्यावर तिच्याच घरात बलात्कार केला आहे. ही घटना दौंड तालुक्यातल्या देऊळगावमध्ये घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. 

दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे एकाने आपण पोलिस असल्याचे सांगत बतावणी केली. त्यानंतर एका महिलेवर बलात्कार ही केला. आरोपींने या पीडित महिलेस आपण पोलीस आहे. तुझे घर तपासायचे आहे असं सांगत घराची तपासणी केली. त्यानंतर शेजारी असलेल्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. झालेल्या प्रकाराने ही महिला हादरून गेली. पोलिस असल्याचं सांगत हा प्रकार आपल्या बरोबर झाल्याने ती घाबरली होती. 

नक्की वाचा - Nashik Crime: लग्नाच्या आमिषाने अत्याचार, घरी एकटी असताना नको ते केलं; अल्पवयीन मुलगी गर्भवती

या घटनेनंतर त्याच स्थितीत तिने दौंड पोलीस ठाणे गाठवे. त्या ठिकाणी तिने झालेली सर्व हकीगत सांगितली. पोलिसच आरोपी असल्यानं तपासाची चक्र वेगाने फिरली. या प्रकरणी संतोष हडागळे या आरोपीला अटक करण्यात आले. तो पोलिस नव्हता हे ही स्पष्ट झालं. त्याने पोलिस असल्याचे खोटे सांगितले होते.  याच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे करीत आहेत. त्याने हा प्रकार कोणत्या हेतूने केला याचा तपास पोलिस करत आहेत. 

Bhiwandi News : खड्ड्यामुळे डॉक्टरचा हकनाक बळी; चूक कोणाची? स्थानिकांचा संतप्त सवाल

    पुणे जिल्ह्यात अलीकडच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार वाढत आहेत. कुठे हुंडाबळी तर कुठे महिलांच्या आत्महत्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. लहान मुली आणि महिलांवर होणारे बलात्काराच्या घटनाही समोर आल्या आहेत. स्वारगेटमध्येही एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार करण्यात आले होते. आता तर पोलिस असल्याचे सांगत महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अशा घटना रोखण्याचे आव्हान पुणे पोलिसां समोर आहे. 

    Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

    Follow us:
    Listen to the latest songs, only on JioSaavn.com