Dombivli Gymkhana Utsav: अडीच लाख पणत्यांपासून साकारली भारतमाता, मोझॅकची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियात नोंद

Dombvili Utsav Bharat Mata Mosaic Art: 95 फूट उंची आणि 75 फूट रुंदीची भारतमातेची ही कलाकृती साकारण्यासाठी अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा वापर करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • डोंबिवली शहरात वंदे मातरम राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साकारली भव्य मोझॅक कलाकृती
  • अडीच लाख रंगीत पणत्यांच्या माध्यमातून 95 फूट उंच आणि 75 फूट रुंदीची भारतमातेची कलाकृती
  • चेतन राऊत, वैभव प्रभू कापसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांनी पूर्ण केली कलाकृती.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
डोंबिवली:

Dombivli Utsav 2025: विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डोंबिवली जिमखाना मैदानावर अडीच लाख रंगीत पणत्यांच्या माध्यमातून भारतमातेची भव्य 'मोझॅक' कलाकृती साकारण्यात आली आहे. या अभिनव प्रयोगाची 'वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया'मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 

नक्की वाचा: Netflix, Amazon Prime का Jio Hotstar? Dhurandhar कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

9 दिवसांच्या अथक प्रयत्नांनी साकारली कलाकृती

95 फूट उंची आणि 75 फूट रुंदीची भारतमातेची ही कलाकृती साकारण्यासाठी अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्या मातीत आपण जन्मलो, त्याच मातीच्या पणत्यांनी भारतमातेला मानवंदना देणे ही संकल्पना या उपक्रमामागे होती. कलाकार चेतन राऊत, वैभव प्रभू कापसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग नऊ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन ही कलाकृती पूर्ण केली आहे.

नक्की वाचा: ना बाली ना थायलंड, कोकणातील निवती बीचची पर्यटकांना भुरळ, कसं जायचं, किती खर्च होईल? वाचा

डोंबिवलीकरांना रविवारपर्यंत पाहाता येणार कलाकृती

डोंबिवलीकर, एक सांस्कृतिक परिवारातर्फे ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल माहिती देताना या संस्थेचे प्रमुख आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या कलाकृतीबद्दल बोलताना म्हटले की, ही केवळ कलाकृती नसून ती भारतमातेप्रती असलेली श्रद्धा आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात रुजवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. डोंबिवली जिमखान्याच्या 'उत्सव'च्या निमित्ताने ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. ही कलाकृती 28 डिसेंबर 2025 पर्यंत नागरिकांना पाहाता येणार आहे.