जाहिरात

Nivati Beach Video: ना बाली ना थायलंड, कोकणातील निवती बीचची पर्यटकांना भुरळ, कसं जायचं, किती खर्च होईल? वाचा

Nivati Beach Viral Video: कोकणातल्या निवती बीचला भेट द्यायचीय? कसे पोहोचला किती होईल खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Nivati Beach Video: ना बाली ना थायलंड, कोकणातील निवती बीचची पर्यटकांना भुरळ, कसं जायचं, किती खर्च होईल? वाचा
"Konkan Tourism News: निवती बीचबाबत सविस्तर माहिती"
NDTV Marathi

Nivati Beach Viral Video: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवडतं डेस्टिनेशन म्हणजे वेंगुर्ले तालुक्यातील निवती बंदर. निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा आणि निवती दीपगृह ही ठिकाणं सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतायेत. त्याशिवाय वेडिंग डेस्टिनेशन, वॉटर स्पोर्ट्स, डॉल्फिन दर्शन आणि खाण्यासाठी ताजे मासे यासह मालवणी संस्कृतीचा पर्यटक अनुभव घेतायेत.  

निवती बीचबाबतची संपूर्ण माहिती​ | Nivati Beach Tourism Guide Tips In Marathi

निवती बीच परिसरातील मुख्य आकर्षण 

स्वच्छ निळेशार पाणी आणि पांढऱ्या रंगाची मऊ वाळू असणारा निवती बीच पर्यटकांना खुणावतोय. सोशल मीडियावरही निवती बीचचे रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील पर्यटक येथे येऊन सुटीचा मनसोक्त आनंद घेतायेत. बीचवर दुपारच्या वेळेस​ डॉल्फिन दर्शन होते,  यासाठी खास बोट राइड्स देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

​गोल्डन रॉक (सोनेरी रंगाचा खडक)

निवती बीच अगदी समुद्राच्या मध्यभागी आहे. सूर्याच्या किरणांमुळे ही जागा सोनेरी रंगाची दिसते. निवती किल्ला किनाऱ्यापासून अगदी जवळ असलेल्या एका डोंगरावर आहे. गडाच्या बुरुजावरून भोगवे बीच आणि कर्ली खाडीचा मनमोहक नजारा दिसतो. सनसेटच्या वेळेस सेल्फी काढण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दीही होते.  

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

म्हातारीची चूल

बोट सफर करताना समुद्रातील खडकांच्या फटीतून पाण्याच्या उंच तुषारांचाही तुम्ही अनुभव घ्याल, यास स्थानिक भाषेत 'म्हातारीची चूल' असे म्हणतात. हे दृश्य पाहण्यासाठी दीपगृहाजवळ जावे लागते. या दीपगृहाजवळ जाण्यासाठी खास होडीचीही सोय केलेली आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी येथे अतिशय सुंदर क्षण तुम्हाला कॅमेऱ्यातही कैद करता येतील.

(नक्की वाचा: Amla Benefits: आवळा हे हिवाळ्यातील सुपरफुड का मानले जाते? थंडीत आवळा खाल्ल्यास काय होते? वाचा 5 फायदे)

​निवती बीचवर पोहोचणार कसे?

  • मुंबईहून कोकण रेल्वेने कुडाळ रेल्वे स्टेशन गाठा. 
  • पुण्याहून प्रवास करणार असाल तर कोल्हापूर गगनबावडा मार्गे कुडाळ असा प्रवास करावा लागेल.
  • कुडाळ रेल्वे स्थानक किंवा कुडाळ एसटी डेपोजवळ आल्यानंतर कुडाळ शहरापासून निवती बीच साधारण 25 किलोमीटर अंतरावर आहे. 
  • मालवण शहरापासून निवती बीच अंतर साधारण 28-30 किलोमीटर आहे.
  • विमानाने प्रवास करणार असाल तर सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. पण विमानसेवा सुरू आहे की नाही, हे आधी तपासावे.

A post shared by SARVESH PEDNEKAR Kokanchaphotographer (@kokanchaphotographer)

राहण्यासाठी सोय कशी करावी

- ​निवती गावात आणि किनाऱ्याजवळ अनेक होम स्टे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला अस्सल मालवणी खाद्यपदार्थांचा (विशेषतः सीफूड) आस्वाद घेता येईल. डॉलफिन बीच रिसॉर्ट हॉटेल, व्ही. आर. रुद्रा रेसिडेन्सी, ​ओशन व्हाइब्स होम स्टे, तारा होम स्टे यासारखे काही लोकप्रिय पर्याय तुम्ही निवडू शकता.  

- दोन व्यक्तींच्या राहण्यासाठी जवळपास 4 हजार रुपये, फिश थाळी 400 रुपये, मटण थाळी 350 रुपये, चिकन थाळी 250 असा खर्च येईल.  

​निवती बीचला कधी भेट द्यावी?

ऑक्टोबर महिना ते मार्च महिना हा काळ निवती बीचला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ आहे. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे बोट राइड्स बंद असू शकतात. निवतीचा किनारा हा अत्यंत स्वच्छ असल्याने तिथे प्लास्टिक कचरा करू नका आणि निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची काळजी घ्या, असे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आलंय.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com