NDTV Marathi Impact : बदलापुरातील स्वानंद आर्केड इमारतीतील 91 कुटुंबांना दिलासा; राहत्या घरावरील संकट टळलं

Badlapur News : रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेसाठी भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाने संपादित केलेल्या जमीनीवर आरक्षण न टाकता ते स्वानंद अर्णव या इमारतीच्या जागेवर टाकलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, बदलापूर

Badlapur News: बदलापूरच्या कात्रप परिसरातील स्वानंद अर्णव या इमारतीतील शेकडो रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. एनडीटीव्ही मराठीच्या बातमीनंतर आता उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी इमारतीच्या जागेवर पडलेलं आरक्षण बदलण्याचे आदेश दिले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकेसाठी भूसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्रशासनाने संपादित केलेल्या जमीनीवर आरक्षण न टाकता ते स्वानंद अर्णव या इमारतीच्या जागेवर टाकलं होतं. त्यामुळे या इमारतीतील 91 कुटुंब अक्षरशः हवालदिल झाले होते. 

इमारतीच्या बाजूच्या जमिनीवर आरक्षण असताना स्वानंद आर्केड या इमारतीवरतीच्या 13 गुंठे जागेवर आरक्षण टाकण्यात आलं आहे. त्यामुळे आता 24 गुंठे क्षेत्रफळात बांधण्यात आलेल्या स्वानंद आर्केड इमारतीला जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे भविष्यात या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

(नक्की वाचा - Pune Traffic : AI द्वारे सुटणार पुण्याच्या वाहतुकीची समस्या, सरकारचा प्लॅन काय?)

लाखो रुपये खर्च करुन या इमारतीतील रहिवाशांनी या सदनिका विकत घेतल्या होत्या. मात्र अशा प्रकारे चुकीचं आरक्षण टाकल्याने या रहिवाशांवर संकट कोसळलं. त्यामुळे हे चुकीचं आरक्षण रद्द करावं, अशी मागणी या रहिवाशांनी केली होती.

Advertisement

याबाबत एनडीटीव्ही मराठीने बातमी दाखवताच प्रशासनानं तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. उल्हासनगर उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी इमारतीच्या जागेवर पडलेलं आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

(नक्की वाचा-  UP News : लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरा-नवरीसोबत भयंकर घडलं; सकाळी बेडरुममधील दृश्य पाहून सगळेच हादरले)

तसेच जमीन अधिग्रहणापोटी चुकीच्या जागा मालकाला देण्यात आलेली रक्कमही परत घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता स्वानंद अर्णव इमारतीतील शेकडो रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article