Ulhasnagar News : उल्हासनगरात खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी, कुटुंबाचा आधार हरपला

Ulhasnagar News : हनुमंत बाबुराव डोईफोडे असं डॉक्टरांचं नाव आहे. हनुमंत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, उल्हासनगर

उल्हासनगरात खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी घेतला आहे. खड्ड्यात गाडी स्लिप होऊन तरुण डॉक्टरचा अपघात झाला होता. उपचारांदरम्यान 28 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून यानंतर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हनुमंत बाबुराव डोईफोडे असं डॉक्टरांचं नाव आहे. हनुमंत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते. रविवारी दुपारी 2 वाजता दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यामुळे त्यांची गाडी स्लिप होऊन अपघात झाला. 

(नक्की वाचा-  Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)

अपघातानंतर डॉ. डोईफोडे कल्याणच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र अति रक्तस्त्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्याने मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या बीड जिल्ह्यातील केज कासरी या मूळगावी नेण्यात आला. 

(नक्की वाचा-  Manmad News : लढवय्या नेता हरपला; ठाकरे गटाच्या नेत्याचं अपघाती निधन)

हनुमंत डोईफोडे यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि अवघ्या 6 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत असून उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article