Pune Police News: पुणे वाहतूक पोलिसांना चॅलेन्ज करणे एका अतिशहाण्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरूणाने आपल्या स्पोर्ट्स बाईकला मॉडिफाईड नंबर प्लेट बसवली होती. मात्र एवढ्यावर न थांबता आपण नियमभंग करतोय याची जाणीव असतानाही त्याने पोलिसांना चॅलेन्ज करण्याची हिंमत दाखवली. पुणे पोलिसांनी देखील या तरुणांचा चॅलेन्ज स्वीकारत या तरुणाला अवघ्या तासाभरात शोधून काढलं आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये आणलं.
या सगळ्या प्रकाराची सुरुवात सोशल मीडियावर झाली. एका Reddit युजरने या बाईकचा फोटो शेअर करत मॉडिफाईड नंबर प्लेटची बाईक कोथरूड पेट्रोल पंपावर दिसल्याचे सांगितले. पुणे पोलीस आणि सीसीटीव्ही फुटेज आजूबाजूला असताना अशा फॅन्सी नंबर प्लेट्सना परवानगी कशी मिळते? असा सवाल या युजरने केला.
पोलिसांना दिलेलं चॅलेन्ज महागात पडलं
यावर नितीश के नावाच्या युजरने 'तुम्हाला शक्य असेल तर मला पकडून दाखवा' असं चॅलेन्ज पुणे पोलिसांना टॅग करत दिलं. त्यानंतर पुणे पोलिसांनीही 'आम्ही करू शकतो आणि पुढेही करू' असं म्हणत हे चॅलेन्च स्वीकारलं आणि अवघ्या तासाभरात या तरुणाला पकडून दाखवलं.
तरुणाने मागितली माफी
पोलिसांना पकडल्यानंतर तरुणांनी सगळी मस्ती उतरली. "माझं नाव राहिल आहे. माझ्याकडे कावासाकी निन्जा बाईक आहे. त्यावर मी मॉडिफाईड नंबर प्लेट लावली आहे. या नंबर प्लेटचा फोटो माझ्या मित्राने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याने पुणे पोलिसांना टॅक करून याला पकडून दाखवा असं चॅलेन्ज केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांना मला तासाभरात पकडलं. मी सर्वांची माफी मागतो आणि कुणीही माझ्यासारखी चुकी करून नका असं सांगतो", असं तरुणाने म्हटलं.
पुणे पोलिसांना केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच इच्छा असेल तर पोलीस काय करु शकतात, हे देखील दाखवून दिलं.