जाहिरात
Story ProgressBack

डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक

Kalyan Crime News : डोंबिवली पोलिसांनी अवघ्या काही तासाच झोमॅटो बॉय यशवंत धोत्रेला अटक केली. यशवंत धोत्रे हा पांडरुंग वाडीत राहतो.

Read Time: 2 mins
डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक

अमजद खान, डोंबिवली

महिला डॉक्टरसोबत अंगलट करणे झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महागात पडलं आहे. एका हाय प्रोफाईल सोसायटीतमध्ये हा प्रकार घडला आहे. महिला डॉक्टर वयोवृद्ध रुग्णाच्या फिजिओ थेरपीसाठी तिथे गेली होती. लिफ्टमध्ये घडलेल्या या घटनेनंतर धाडसी महिला डॉक्टरने त्याचा प्रतिकार केला. महिला डॉक्टरने त्या झोमॅटो बॉयलर पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून गेला. महिला डॉक्टरने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी झोमॅटो बॉयला अटक केली आहे. 

(नक्की वाचा- डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव)

यशवंत धोत्रे असं या आरोपी झोमॅटो बॉयचं नाव आहे. महिला डॉक्टर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीत वयोवृद्धाला फिजिओ थेरपी देण्यासाठी गेली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमासार महिला डॉक्टर सोसायटीच्या सातवा मजल्यावरून खाली लिफ्टमधून येत होती. सहाव्या मजल्यावर एका झोमॅटो बॉयने लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्टचं दार बंद होताच होताच त्याने महिला डॉक्टरशी अंगलगट करुन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. 

Dombivli crime news

Dombivli crime news

महिला डॉक्टरने जोरदार प्रतिकार केला. तिने तातडीने लिफ्टचे ग्राऊंड फ्लोअरचे बटन दाबले. लिफ्टचे दार उघडताच डिलिव्हरी बॉय पळून गेला. त्यानंतर महिला डॉक्टरने सहाव्या मजल्यावर प्रत्येक घरात जाऊन चौकशी केली की झोमॅटो बॉय कुणाकडे आला होता. त्यानंतर महिला डॉक्टरला तो कुठून आला होता याची माहिती मिळाली. महिला डॉक्टर त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात पोहचली. 

(नक्की वाचा- बघतोस काय रागाने...! पाहणे-शिवीगाळीवरून चोघांमध्ये झाला वाद व पुढे घडली हादरवणारी घटना)

डोंबिवली पोलिसांनी अवघ्या काही तासाच झोमॅटो बॉय यशवंत धोत्रेला अटक केली. यशवंत धोत्रे हा पांडरुंग वाडीत राहतो. अन्य काही महिलांसोबत त्याने असा काही प्रकार केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आता शालेय पोषण आहारात अंडा-सोयाबीन पुलाव अन् मोड आलेली कडधान्य, 15 नव्या पदार्थांचा समावेश
डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक
vegetable prices hiked due to unseasonal rains nashik prices Coriander at Rs 20 to 60 Rs
Next Article
बाजारात पाऊल ठेवायचं तरी कसं? 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ, किमती पाहून धडकीच भरेल!
;