भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीचा सिलसिला कायम राहिला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 474 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर भारतावर पहिल्या डावातच फॉलोऑनचं सावट होतं. प्रमुख खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी निराशा केल्यानंतर अखेरच्या फळीत नितीशकुमार रेड्डीने धडाकेबाज खेळी करत भारताला फॉलोऑनच्या सावटातून बाहेर काढलं.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात वॉशिंग्टन सुंदरच्या सहाय्याने नितीशकुमार रेड्डीने सुरेख भागीदारी करत भारताला त्रिशतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. यादरम्यान नितीशने आपलं कसोटी क्रिकेटमधलं अर्धशतकही पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर चौकार लगावत नितीशने हाफ सेंच्युरी झळकावली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा चौकार लगावल्यानंतर नितीशने अल्लु अर्जूनच्या पुष्पा या सिनेमातील आयकॉनिक स्टाईलची कॉपी करत कांगारुंना मै झुकेगा नही असं आव्हान दिलं आहे....पाहा हा व्हिडीओ
या संपूर्ण मालिकेत नितीशकुमार रेड्डीने आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित केलं आहे. पर्थ येथील पहिल्या कसोटी सामन्यात नितीशने 41 आणि नाबाद 38 अशी महत्त्वाची खेळी केली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने 42 धावा केल्या. तिसऱ्या कसोटीत तो स्वस्तात बाद झाला असला तरीही चौथ्या कसोटी सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी आपल्या संघाची बाजू सांभाळून घेत आपली निवड सार्थ ठरवली आहे.
हे ही वाचा - BGT 2024-25 : Rohit Sharma चे दिवस भरले? निवड समिती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत