INDIA vs AUSTRALIA 1st Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही टेस्ट मॅच आजपासून ( 22 नोव्हेंबर) सुरु झाली आहे. आज या टेस्ट मॅचमधील पहिली सीरिज पर्थमधील ऑप्टस स्टेडीयम येथे होत आहे. ऑस्ट्रेलिया टीमने येथे एकही टेस्ट मॅच गमावलेली नाही. त्यामुळे हा इतिहास बदलण्यासाठी आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासाठी ही महत्त्वाची सीरिज आहे.
(नक्की वाचा: IND vs AUS 1st Test: कधी सुरु होणार मॅच, कुठे पाहणार Live, कशी असेल Playing 11, वाचा सर्व माहिती)
भारताचा कॅप्टन जसप्रीत बुमराहने टॉस जिंकला असून, बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम बॅटींग करताना यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल शुन्यावर बाद झाला आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने केवळ पाच रन करुन विकेट गमावली आहे.
शुबमन गिल सराव सामन्यात जखमी झाल्यामुळे तो पहिली टेस्ट खेळणार नाही. तर,रोहित शर्मा देखील कौटुंबीक कारणामुळे पहिली सीरिज खेळणार नाही. रोहित आणि गिलच्या अनुपस्थितीसह भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे अनुभवी अष्टपैलू खेळाडू देखील नाही आहेत. मात्र, या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी टेस्ट मॅचमध्ये पदार्पण केले आहे.
(नक्की वाचा: वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची आयपीएल ऑक्शनमध्ये शेवटच्या क्षणी एन्ट्री, कोण करणार खरेदी?)
नव्या खेळाडूंचे पदार्पण
पर्थ कसोटीत हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी टेस्ट मॅचमध्ये पदार्पण केले आहे. आयपीएल 2024 मध्ये नितीश कुमारने सनरायझर्स हैदराबादकडून तुफानी बॅटींग करत अनेक विक्रम मोडीत काढले होते. ज्यामुळे सनरायझर्स हैदराबाद टीमने त्याला आयपीएल 2025 साठी सुद्धा रिटेन केले आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचमध्ये पदार्पण करत असलेला, हर्षित राणा हा फास्ट बॉलर आहे. त्यानेसुद्धा आयपीएलमध्ये कमालीची कामगीरी बजावली आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज