मानसी पिंगळे, प्रतिनिधी
India vs Australia 1st test preview : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे. यापूर्वी भारतीय टीमला मायदेशात झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 0-3 असा लाजीरवाणा पराभव सहन करावा लागलाय. या पराभवामुळे टीम इंडियाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसलाय. आता क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा स्वत:चा दबदबा प्रस्थापित करण्यासाठी भारताला ही सीरिज जिंकावी लागेल.
टीम इंडियानं ही सीरिज 4-0 या फरकानं जिंकली तर भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये निश्चित प्रवेश करेल. तसं झालं नाही तर टीम इंडियाला फायनल गाठण्यासाठी दुसऱ्या टीमवर अवलंबून राहावं लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपपोर्टनुसार,
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाच्या डोकेदुखीत भर
पर्थमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टपूर्वी दबावात असलेल्या टीम इंडियाच्या डोकेदुखीत आणखी भर पडलीय. शुबमन गिल सराव सामन्यात जखमी झालाय. त्यामुळे तो पहिली टेस्ट खेळणार नाही. तर रोहित शर्मा देखील कौटुंबीक कारणामुळे अद्याप ऑस्ट्रेलियात दाखल झालेला नाही. रोहित आणि गिलच्या अनुपस्थितीमुळे समतोल प्लेईंग 11 ची निवड करणे ही टीम मॅनेजमेंटसमोर डोकेदुखी असेल.
( नक्की वाचा : टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत! पहिल्या टेस्टमधून आऊट )
कुणाला मिळणार मदत?
पर्थमधील पिच फास्ट बॉलर्सना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पिचवर बाऊन्सर्सचा सामना करणे ही बॅटर्ससाठी नेहमी कसोटी असते. या मैदानात फास्ट बॉलर्सचा स्ट्राईक रेट हा स्पिनर्सपेक्षा चांगला आहे. पण, या पिचवर सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर नॅथन लॉयन आहे.
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं डावखुऱ्या फलंदाजांना चांगलंच त्रस्त केलं होतं. दुसरिकडं अनुभवी ऑफ स्पिनर अश्विनचा डावखुऱ्या बॅटर्स विरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळे तीन स्पिनर्ससह ऑस्ट्रेलियात गेलेली भारतीय मॅनेजमेंट कुणाला संधी देणार हे पाहावं लागेल.
( नक्की वाचा : IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस )
कधी आणि कुठं होणार मॅच?
- भारत आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमधील पहिली लढत 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पर्थमध्ये होणार आहे.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.50 मिनिटांनी ही मॅच सुरु होईल.
- पहिल्या दिवशी मॅच सुरु होण्याच्या अर्धा तास आधी टॉस होईल.
- 'स्टार स्पोर्ट्स' या सीरिजचा भारतामधील अधिकृत ब्रॉडकास्टर आहे. स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर ही मॅच पाहाता येईल.
- 'डिस्ने+ हॉटस्टार' अॅपवर ही मॅच ऑनलाईन पाहाता येईल.
कशी असेल टीम इंडियाची Playing11
पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया कोणत्या खेळाडूंसह उतरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये अभिमन्यू इश्वरन यशस्वीसह इनिंगची सुरुवात करु शकतो. तर गिलच्या जागी ध्रुव जुरेलचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. अश्विन आणि सुंदरपैकी एकाची निवड होईल. तर तीन फास्ट बॉलर प्लेईंग 11 मध्ये असतील हे निश्चित आहे.
टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेट किपर) ध्रुव जुरेल, आर. अश्विन/वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह (कॅप्टन), मोहम्मद सिराज आणि आकाश दीप
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world