Cricket News: काव्या मारननं हे काय केलं? 'या' पाकिस्तानी खेळाडूंना टीममध्ये घेतलं, उडवले कोट्यवधी रुपये

एका पाकिस्तानी खेळाडून ऐवढी मोठी रक्कम देवून त्यांनी संघात कसे काय घेतले याची चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • भारत-पाकिस्तान राजकीय तणावामुळे आयपीएलमध्ये २००९ पासून पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी आहे
  • सन रायझर्स लीड्सने द हंड्रेड लिलावात पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला १९०,००० पाउंडमध्ये करारबद्ध केले आहे
  • काव्या मारन यांनी या खेळाडूवर मोठी बोली लावून संघात घेतले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. असं असली तरी, परदेशी लीगमधून हे चित्र बदलताना दिसत आहे. 'द हंड्रेड' लीगच्या लिलावात गुरुवारी सन रायझर्स लीड्सने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदला करारबद्ध करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एखाद्या भारतीय मालकीच्या फ्रँचायझीने पाकिस्तानी खेळाडूला विकत घेण्याची ही 2009 नंतरची पहिलीच वेळ ठरली आहे.

अबरार अहमदला आपल्या संघात घेण्यासाठी सन रायझर्स लीड्स आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. अखेर सन समूहाने 19,0000 पाउंड, अंदाजे 2.34 कोटी रुपये मोजून अबरारला आपल्या ताफ्यात सामील केले. सन ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काव्या मारन या लिलावात स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एका पाकिस्तानी खेळाडून ऐवढी मोठी रक्कम देवून त्यांनी संघात कसे काय घेतले याची चर्चा सुरू झाली आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Kuldeep Yadav Marriage: कोण आहे कुलदीप यादवची होणारी बायको वंशिका?ऑस्ट्रेलियाशी काय आहे कनेक्शन?

आयपीएलमध्ये 2009 पासून पाकिस्तानी खेळाडूंना स्थान दिले जात नाही. त्यामुळे परदेशी लीगमधील भारतीय मालकीच्या संघांबाबतही अशीच चर्चा होती. मात्र, काव्या मारन यांनी अबरारवर बोली लावून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अबरार व्यतिरिक्त उस्मान तारिक या दुसऱ्या पाकिस्तानी खेळाडूला बर्मिंगहॅम फिनिक्सने 14,0000 पाउंडमध्ये खरेदी केले आहे. ही लीग 21 जुलै ते 16 ऑगस्ट 2026 या कालावधीत खेळवली जाईल. या निवडीचा थेट फायदा पाकिस्तानी खेळाडूंना मिळणार आहे. 

नक्की वाचा - Cricket News: 'बुमराहला स्लोअर बॉल टाकायला मी शिकवलं' पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ

सन समूहाने गेल्या वर्षी 'नॉर्दर्न सुपरचार्जर्स'चा ताबा घेतला होता. ज्याचे नाव आता 'सनरायझर्स लीड्स' असे आहे. अबरार अहमदला मिळवण्यासाठी काव्या मारन यांनी मोठी बोली लावली. पाकिस्तानच्या या रहस्यमयी फिरकीपटूसाठी ट्रेंट रॉकेट्सनेही प्रयत्न केले, पण काव्या मारन यांनी माघार घेतली नाही. भारत-पाक संबंधांमुळे आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना एन्ट्री नाही. मात्र, काव्या मारन यांच्या या पावलामुळे 'द हंड्रेड' सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय मालक पाकिस्तानी गुणवत्तेला वाव देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नक्की वाचा - Cricket News: टीम इंडियाचा टी-20 कॅप्टन बदलणार! सूर्याच्या जागी 'हे' 3 खेळाडू शर्यतीत, BCCI चा नवा प्लॅन