BCCI New President Mithun Manhas: भारताचा माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत मन्हास यांच्या खांद्यावर नवे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली. मिथून मन्हास यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून वर्णी लागली असून राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
मन्हास यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. मन्हास जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेचे सदस्यही आहेत. दरम्यान, मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलीय. सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांचीही यापूर्वी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती.
नक्की वाचा >> "धोनी आणि कोहलीनेही..", साहिबजादा फरहानचं खळबळजनक विधान! गन सेलिब्रेशनबाबत 'हे' काय बोलून गेला
कोण आहेत मिथून मन्हास?
मिथून मन्हास यांनी डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. त्यांनी 157 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 9714 धावा कुटल्या आहेत. तसच मन्हास यांनी क्रिकेट करिअरमध्ये 27 शतक आणि 49 अर्धशतक झळकावले आहेत. इतकच नव्हे, तर टी-20 च्या 91 सामन्यांमध्ये त्यांनी 1170 धावांचा डोंगर रचला होता. मन्हास यांनी जम्मू काश्मीर आणि दिल्लीच्या संघाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीर क्रिकेटमध्ये अनेक तरुण खेळाडूंनी धडे गिरवले आहेत. मन्हास आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स, दिल्ली आणि सीएसकेच्या संघासाठी खेळले होते.
नक्की वाचा >> Suryakumar Yadav: ICC ला खुपला 'पहलगाम'चा उल्लेख, फायनलपूर्वी सुर्यावर मोठी कारवाई
रॉजर बिन्नी यांच्यानंतर मिथून मन्हास आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची धुरा सांभाळणार आहेत. तर राजीव शुक्ला उपाध्यक्षपदावर,देवजीत सौकिया मानद सचिव, तर प्रभतेज सिंह भाटिया यांची संयुक्त सचिवपदी निवड करण्यात आली आहे.