जाहिरात

"धोनी आणि कोहलीनेही..", साहिबजादा फरहानचं खळबळजनक विधान! गन सेलिब्रेशनबाबत 'हे' काय बोलून गेला

"धोनी आणि कोहलीनेही..", साहिबजादा फरहानचं खळबळजनक विधान! गन सेलिब्रेशनबाबत 'हे' काय बोलून गेला
Sahibzada Farhan Latest News

Sahibzada Farhan latest News : आशिया कप 2025 चा थरार सुरु असून रविवारी 28 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा महामुकाबला रंगणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या टूर्नामेंटमध्ये भारताने पाकिस्तानला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारली. परंतु, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक ठोकल्यानंतर गन सेलिब्रेशन केलं अन् संपूर्ण क्रिडाविश्वात एकच खळबळ उडाली. फरहानच्या या वादग्रस्त कृत्याचा आयसीसीने चांगलाच समाचार घेतला असून आता याप्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. आयसीसीला प्रत्युत्तर देत फरहानने म्हटलं की,'या कृत्यामागे कोणतंही राजकारण नव्हतं. हे वैयक्तिक सेलिब्रेशन होतं. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहलीनंही अशाप्रकारचं सेलिब्रशेन केलं होतं'.

साहिबजादा फरहानने मैदानात केलं होतं वादग्रस्त गन- सेलिब्रेशन 

साहिबजादा फरहानने भारताविरोधात झालेल्या सुपर-4 सामन्यादरम्यान वादग्रस्त सेलिब्रेशन केलं होतं. पण त्या ऑन-फिल्ड सेलिब्रेशनमागे कोणत्याही प्रकारचं राजकारण नसल्याचं फरहाने स्पष्ट केलं आहे. असं कृत्य करून कोणत्याही प्रकारचा राजकीय मेसेज पसरवायचा नव्हता, असंही स्पष्टीकरण फरहाने आयसीसीला दिलं आहे. 

नक्की वाचा >> बायको पळून गेल्यावर नवऱ्याची सटकली!मेव्हणीसोबत केलं सर्वात भयंकर कृत्य, पुतणीलाही सोडलं नाही

इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, फरहाने आधी झालेल्या घटनांचा दाखला देत म्हटलं की, भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी आणि विराट कोहलीनेही अशाप्रकारचं गन सेलिब्रेशन केलं होतं. फरहानने म्हटलं की, अशाप्रकारचं सेलिब्रेशन त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि आनंदाच्या क्षणी किंवा लग्नसमारंभात असं सेलिब्रेशन केलं जातं, असंही तो म्हणाला. भारताने हारिस रौफच्या सेलिब्रेशनविरोधातही आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. +

नक्की वाचा >> आजारी पडलेल्या सुनेला सासऱ्याने पीठ मळून दिलं, मुलाने पाहिलं अन् नंतर असं काही केलं..व्हायरल Video पाहून सर्वच झाले थक्क

फरहान आणि हारिस रौफने मैदानात केलेल्या वादग्रस्त सेलिब्रेशनमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. कारण पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर बेछूट गोळीबार केला होता. फरहाननेही बॅट हातात घेऊन अशाच प्रकारे गन-सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळे भारतीयांनी फराहनवर सडकून टीका केली आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com