IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होईल? कोणाला मिळेल सुपर-8 चं तिकीट?

भारत आणि पाकिस्तान यांचा महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याला फक्त दोन दिवस उरले असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
India vs Pakistan Match 2026

Rain Threat on India vs Pakistan T20 World Cup Match : भारत आणि पाकिस्तान यांचा महामुकाबला 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्याला फक्त दोन दिवस उरले असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. श्रीलंकन हवामान खात्याने 15 फेब्रुवारी रोजी दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. या दिवशी हवामानात बदल होऊ शकतो आणि पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.

श्रीलंकन हवामान विभागाच्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजेपर्यंत हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, रात्री 8 वाजल्यानंतर परिस्थिती पुन्हा सामान्य होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या वेळी वादळासह हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानचा सामना पावसामुळे प्रभावित होऊ शकतो. पण सामना रद्द होण्याची शक्यता खूपच कमी आहे. याशिवाय, सामना होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारीही थोड्या पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे भारताच्या सराव सत्रावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, या लहान बेट देशांमध्ये हवामानाचा अंदाज नेहमी अचूक ठरत नाही. कारण हवामान कोणत्याही क्षणी बदलू शकते.

नक्की वाचा >> Pune News : पुणे महापालिकेत खळबळ! अधिकाऱ्यांसमोर एकाने डोक्याला पिस्तुल लावलं...पुढे काय घडलं?

प्रेमदासा स्टेडियममध्ये काय काय आहेत सुविधा?

प्रेमदासा स्टेडियममध्ये कोलंबोतील उष्णकटिबंधीय मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक जलनिकासी प्रणाली आणि विशेष ग्राउंड स्टाफ प्रोटोकॉल उपलब्ध आहेत. प्रेमदासामध्ये संपूर्ण मैदान झाकण्यासाठी पुरेसे कव्हर्स आहेत. यामुळे आउटफिल्डमध्ये पाणी साचण्यापूर्वीच ते रोखता येतं. ग्राउंड स्टाफ एक कव्हरवरून दुसऱ्या कव्हरकडे पाणी ढकलत नेतात. हा उपाय अत्यंत प्रभावी असून सुपर सोपरपेक्षा जलद पाणी काढून टाकतो. सामान्य परिस्थितीत, मुसळधार पाऊस थांबल्यानंतर 45 ते 60 मिनिटांत मैदान खेळण्यासाठी तयार होते.

जर सामना रद्द झाला तर काय होईल?

जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही किंवा खेळण्याच्या परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला, तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जातील. टी20 वर्ल्ड कपच्या गट-स्तरातील सामन्यांसाठी रिझर्व्ह डे नाही. ग्रुप ‘ए' मध्ये सध्या टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांकडे 4-4 गुण आहेत, पण भारताचा नेट रन-रेट पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भयंकर प्रकार, आंबेडकरी संघटना आक्रमक, काय घडलंय?

पण जर भारताला नेदरलँड्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला, तर पाकिस्ता नामिबियाविरुद्धचा शेवटचा गट-सामन्यात पराभव होणे भारतासाठी फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत भारत चांगल्या नेट रन-रेटच्या आधारे सुपर-8 मध्ये प्रवेश मिळवू शकतो. भारत–पाकिस्तान सामना रद्द झाला की अमेरिका आणि नामिबिया सुपर-8 च्या शर्यतीतून बाहेर पडतील.