Ind Vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. चौथा कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियापुढे हा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असून संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज सामन्यातून बाहेर राहिला आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात खेळणार नसल्याचे सूचक संकेत प्रशिक्षक गौतम गंभीरने दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज आकाश दीप पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. यामुळेच त्याला शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. मेलबर्न कसोटीत त्याने एकूण 43 षटके टाकली ज्यामध्.े त्याला केवळ दोन विकेट घेता आल्या. दुसरीकडे मेलबर्न कसोटीत लोकांना रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र त्याने अनेक खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या होत्या.
पण इथेही त्याच्या निष्काळजीपणामुळे तो बाहेर पडला. ज्यानंतर पंतला संघाबाहेर जावे लागणार असल्याची चर्चा आहे. संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघ मोठ्या संकटात असताना त्याने असे वाईट शॉट्स का निवडले? असे म्हणत नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे पंतला बाहेर काढून त्याच्या जागी ध्रुव जुरेलचा संघात समावेश झाल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? नाराज अब्दुल सत्तारांनी काय संकेत दिले?
कर्णधार रोहित शर्मालाही संघातून वगळणार असल्याचे मोठे संकेत गौतम गंभीरने दिलेत. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला रोहितच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने "रोहित शर्मासोबत सर्व काही ठीक आहे. मुख्य प्रशिक्षक तुमच्यासमोर आहे, तुम्ही त्याच्यावर समाधानी राहा. आम्ही उद्या पुन्हा एकदा खेळपट्टीची पाहणी करू आणि त्यानंतरच प्लेइंग इलेव्हनवर निर्णय घेऊ, असं तो म्हणाला.
तसेच या सर्व प्रकारानंतर रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही, असा प्रश्न परिषदेत पुन्हा विचारण्यात आला. यावर प्रशिक्षक गंभीरने चिथावणीखोर प्रत्युत्तर देत मी आधीच सांगितले आहे की आम्ही उद्या खेळपट्टीची चाचणी घेऊ आणि त्यानंतरच प्लेइंग इलेव्हनबाबत निर्णय देऊ. गंभीरच्या या वक्तव्याने दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world