India vs Australia ICC Womens ODI World Cup Semi Final All Record Broken: महिला क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताच्या 'विमेन इन ब्लू' (Women in Blue) संघाने इतिहास रचला आहे! जेमिमाह रॉड्रिग्जच्या (Jemimah Rodrigues) अविस्मरणीय नाबाद 127 रनच्या खेळीच्या जोरावर भारताने सात वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा (Australia) पाच विकेट्सने पराभव करत थेट अंतिम फेरीत (Final) धडक मारली आहे. विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठ्या रन-चेसचा (Run-Chase) विक्रम मोडत भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील 15 सामन्यांपासून चालत आलेला विजयीरथ थांबवला.
या जबरदस्त विजयामुळे आता 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) हे दोन संघ आमनेसामने असतील आणि या स्पर्धेला एक नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार आहे.
जेमिमा आणि हरमनप्रीतचा शानदार खेळ
जेमिमा रॉड्रिग्जने सर्वात मोठ्या मंचावर आपल्या जीवनातील सर्वोत्तम खेळी साकारली. तिच्या 134 बॉलमध्ये 14 चौकारांसह नाबाद 127 रनच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन ओपनिंग बॅटर (Opening Batter) फोबी लिचफिल्डचे (Phoebe Litchfield) शतक फिके पडले. भारताने 340 रनचे लक्ष्य केवळ नऊ बॉल बाकी असताना, 5 विकेट्स गमावून 341 रन करत पूर्ण केले. हा महिला वन-डे क्रिकेटमधील (Women's ODI Cricket) सर्वात मोठा यशस्वी रन-चेस ठरला.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues : बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण करत टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारी जेमिमा रॉड्रिग्स कोण आहे? )
जेमिमाला नशिबाचीही साथ मिळाली आणि मिळालेल्या 'जीवनदानांचा' तिने पूर्ण फायदा घेतला. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत (Harmanpreet Kaur) तिसऱ्या विकेटसाठी 167 रनची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप (Partnership) केली. हरमनप्रीतनेही 89 रनची धडाकेबाज खेळी केली. याच पार्टनरशिपच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या दोन टप्प्यांत 15 सामन्यांपासून चालत आलेल्या अपराजित (Unbeaten) अभियानाचा शेवट केला.
𝐇𝐞𝐫𝐜𝐮𝐥𝐞𝐚𝐧. 𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐢𝐜 🇮🇳#TeamIndia pull off the highest successful run-chase in women's ODI history to enter the #Final 👏🫡
— BCCI Women (@BCCIWomen) October 30, 2025
Drop one word for that effort 👇
Scorecard ▶ https://t.co/ou9H5gN60l#WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS pic.twitter.com/S0O2lYf6XO
सामन्यादरम्यान तुटलेले मोठे विश्वविक्रम (World Records Broken)
भारताच्या या ऐतिहासिक विजयादरम्यान अनेक मोठे विक्रम मोडले गेले, ज्यांनी या सामन्याला अविस्मरणीय बनवले:
सर्वात मोठा यशस्वी रन-चेस: भारताने 339 रनचे लक्ष्य यशस्वीरीत्या पूर्ण करून महिला वन-डे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) स्थापित केला. हा महिला वन-डेच्या इतिहासातील 'सर्वात मोठा यशस्वी रन-चेस' आहे. यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी याच महिन्यात विशाखापट्टणममध्ये 331 रनचे लक्ष्य पूर्ण केले होते.
वर्ल्ड कप नॉकआऊटमधील पहिला 300+ रन-चेस: महिला किंवा पुरुष, वन-डे विश्वचषकाच्या नॉकआऊट (Knockout) सामन्यांमध्ये 300 हून अधिक रनचे यशस्वी लक्ष्य पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पुरुष विश्वचषकात 2015 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 298 रन केले होते.
वन-डेतील तिसरा 300+ रन-चेस नॉकआऊट: महिला आणि पुरुष वन-डेमधील कोणत्याही स्पर्धेच्या नॉकआऊट सामन्यात 300 रनचा यशस्वी रन-चेस होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1998 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 315 रन आणि 2002 मध्ये नेटवेस्ट ट्राय-सिरीज फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध 326 रनचे लक्ष्य पूर्ण केले होते.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: ऐतिहासिक सेंच्युरीनंतर धाय मोकलून का रडू लागली जेमिमा? विजयानंतर केलं मोठं वक्तव्य, VIDEO )
सर्वाधिक एकूण रन: या एकाच सामन्यात एकूण 679 रन बनले. हा महिला वन-डेमध्ये कोणत्याही सामन्यात बनवलेला दुसरा सर्वाधिक (Second Highest) एकूण रनचा आकडा आहे. याच यादीत दिल्लीत वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात एकूण 781 रन बनले होते, जो पहिल्या क्रमांकावर आहे.
लक्ष्य पूर्ण करताना दुसरा सर्वात मोठा स्कोर: 339 रनचे लक्ष्य पूर्ण करताना भारताने 48.3 ओव्हर्समध्ये 341 रन केले. लक्ष्य पूर्ण करताना कोणत्याही संघाने केलेला हा दुसरा सर्वात मोठा स्कोर (Second Highest Score) आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतच आहे, ज्यांनी दिल्ली वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचे लक्ष्य पूर्ण करताना 369 रन केले होते.
सर्वाधिक सिक्सर्स (Sixes): या सामन्यात एकूण 14 सिक्सर्स मारले गेले, जे महिला वन-डे विश्वचषकाच्या कोणत्याही सामन्यात मारलेले सर्वाधिक आहेत.
भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक स्कोर: जेमिमाचा नाबाद 127 रनचा स्कोर हा वन-डे रन-चेसमध्ये (ODI Run-Chase) भारतीय महिला बॅटरने केलेला सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आहे. यापूर्वीचा विक्रम स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) नावावर होता, जिने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 125 रन केले होते.
नॉकआऊटमधील पहिली रन-चेस करताना सेंच्युरी: महिला वर्ल्ड कपच्या नॉकआऊट सामन्यात शतक करणारी जेमिमा ही दुसरी भारतीय बॅटर आहे (2017 च्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीतचे 171* रन). मात्र, नॉकआऊटमध्ये 'लक्ष्याचा पाठलाग' (Chasing a Target) करताना सेंच्युरी करणारी ती पहिलीच भारतीय आहे.
( नक्की वाचा : Jemimah Rodrigues: हा चमत्कार बायबलमुळे झाला! ऑस्ट्रेलियाला लोळवणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्सनं सांगितलं ऐतिहासिक इनिंगचं रहस्य, पाहा VIDEO )
सर्वात मोठी भागीदारी: जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली 167 रनची भागीदारी महिला वन-डे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही जोडीने केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सचा (Spinners) निराशाजनक परफॉर्मन्स : या महत्त्वपूर्ण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सनी एकूण 23.3 ओव्हर्स टाकल्या आणि कोणतीही विकेट न घेता तब्बल 157 रन दिले. महिला वन-डेच्या इतिहासात स्पिनर्सनी कोणतीही विकेट न घेता टाकलेले हे सर्वाधिक ओव्हर्स आहेत. यापूर्वीचा विक्रम 2012 मध्ये सिडनी येथे न्यूझीलंडविरुद्ध 23 ओव्हर्सचा होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world