जाहिरात

एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? नाराज अब्दुल सत्तारांनी काय संकेत दिले?

छत्रपती संभाजीनगर मधील सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या मैदानावर सत्तार यांचा नागरी सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? नाराज अब्दुल सत्तारांनी काय संकेत दिले?
छत्रपती संभाजीनगर:

राज्यात महायुतीचे सरकार आले. काही जुन्या मंत्र्यांना वगळले गेले. त्यात शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तारही होते. निवडणूक जिंकली पण मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यांच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगरच्या संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली. त्यानंतर सत्तार हे काही काळ राजकारणापासून दुर होते. पण स्वत:च्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपली पुढची दिशा काय असणार याचे संकेतच दिले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 अब्दुल सत्तार यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आपली ताकद ही जनता आहे. सरपंच ते मंत्री अशी वेगवेगळी पदं भूषवली. त्यावेळी तुम्ही साथ दिली. यापुढेही तुमची साथ मिळेल असं सत्तार यावेळी म्हणाले. शिवाय मंत्री न केल्यामुळे नाराजी ही त्यांनी व्यक्त केली. त्यावर बोलताना कुछ देर तक खामोशी है. कुछ देर बात तुम्हारे कानो में शोर आयेगा.अब तुम्हारा वक्त आया है, कुछ देर बाद हमारा दौर आयेगा. असं सांगत आपण पुन्हा नक्की मंत्री होवू असं सत्तार यांनी सुचित केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Beed Crime: मंत्र्याचं नाव सांगत अपहरण,मारहाण, पायाला कुलप लावलं अन् लाखोची लुट

एकनाथ शिंदेंचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही, असं यावेळी सत्तार यांनी स्पष्ट केलं. वरिष्ठांनी आपल्याला अडीच वर्षे थांबायला सांगितलं आहे. अडीच वर्षानंतर मंत्रीपद दिलं जाणार आहे असं ही ते म्हणाले.  एकनाथ शिंदे यांचा विश्वास असेपर्यंत शिवसेना सोडून कुठेही जाणार नसल्याचं ते म्हणाले. ज्यावेळी शिंदे यांचा माझ्यावर विश्वास असणार नाही तेव्हा तुम्हाला विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेऊ असंही  सांगायला सत्तार विसरले नाहीत. शिवाय आपल्यावर फडणवीसांचाही विश्वास आहे असंही ते म्हणत त्यांनी शिंदेंनाही सुचक इशारा दिला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Vinod Kambli: विनोद कांबळीची झुकेगा नही साला स्टाईल, डिस्चार्ज मिळताच सर्वात आधी काय केलं?

छत्रपती संभाजीनगर मधील सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या मैदानावर सत्तार यांचा नागरी सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात सत्तार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळण्याचे संकेत दिले. या सोहळ्याला काँग्रेस खासदार कल्याण काळेही उपस्थित होते. मात्र सत्तार यांच्या पक्षातील नेत्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ केली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com