
Ind vs Aus Women's World Cup Match : भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian Women's Cricket Team) सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सुरू असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या १३व्या सामन्यात विक्रमांची मालिकाच उभी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात मानधना आपल्या शतकापासून वंचित राहिली आणि ६६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.
सर्वात जलद ५,००० वनडे धावा
मंधानाने तिची जोडीदार प्रतिका रावल सोबत १५५ धावांची विक्रमी सलामीची भागीदारी करत अनेक मोठे विक्रम मोडले. या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान मंधानाने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत ५,००० धावांचा टप्पा पूर्ण केला आणि एक नवा विश्वविक्रम रचला. मंधानाने हा पराक्रम करण्यासाठी केवळ ११२ इनिंग्ज घेतल्या.
महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद: महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये (Women's ODI) सर्वात कमी इनिंग्जमध्ये ५,००० धावा पूर्ण करणारी मंधाना ही पहिली फलंदाज ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर (Stafanie Taylor) यांच्या नावावर होता, ज्यांनी १२९ इनिंग्जमध्ये हा टप्पा गाठला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मानधना पुरुष किंवा महिला भारतीय खेळाडूंमध्येही (Indian Players) सर्वात जलद ५,००० वनडे धावा करणारी फलंदाज ठरली आहे.
जागतिक स्तरावर पुरुष आणि महिला खेळाडूंचा विचार केल्यास, स्मृती मंधाना सर्वात जलद ५,००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे बाबर आझम (Babar Azam): ९७ इनिंग्ज, हाशिम आमला (Hashim Amla): १०१ इनिंग्ज, स्मृती मानधना (Smriti Mandhana): ११२ इनिंग्जमध्ये 5,000 धावांचा टप्पा पार केला आहे.
मंधानाने या विक्रमात वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स (Viv Richards), भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि शाई होप (Shai Hope) यांना मागे टाकले आहे. या तिघांनाही ५,००० धावा पूर्ण करण्यासाठी ११४ इनिंग्ज लागल्या होत्या. याशिवाय, स्मृती मंधाना एका कॅलेंडर वर्षात १,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारी पहिली महिला फलंदाज ठरली आहे. तिने २०२५ मध्ये आतापर्यंत १८ सामन्यांत हा विक्रम केला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क यांनी १९९७ मध्ये ९७० धावा केल्या होत्या.
( नक्की वाचा : Shubman Gill: "होय, 2027...."; रोहित-विराटच्या भवितव्यावर कॅप्टन गिलचं ठाम वक्तव्य, निवड समितीला स्पष्ट संदेश )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world