टी-20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर हार्दिक भारतीय संघात हवाच, इंग्लंडच्या माजी कॅप्टनची पांड्यासाठी बॅटींग

पुढचे काही दिवस चाहत्यांना हार्दिक पांड्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. कारण हार्दिक पांड्या जर फॉर्मात असेल तर भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकायचे जास्त चान्सेस आहेत, असं वॉन म्हणाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
फोटो सौजन्य - IPL
मुंबई:

सध्या भारतात आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे. परंतु मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम फारसा चांगला जाताना दिसत नाहीये. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्याचा मुंबई इंडियन्स प्रशासनाचा निर्णय चांगलाच महागात पडताना दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून हार्दिकची कामगिरी ही यथातथा राहिली आहे.  इतकच नव्हे तर ज्या मैदानात मुंबईचा संघ खेळायला जातो तिकडे चाहते त्याची टर उडवताना दिसत आहेत. इतकच नव्हे तर सोशल मीडियावरही हार्दिकची चेष्टा होताना दिसत आहे. अनेक माजी खेळाडूंनी घडत असलेल्या या प्रकाराबद्दल नाराजीवजा आश्चर्य व्यक्त केलं आहे.

रविवारी वानखेडे मैदानावर मुंबईला चेन्नईकडून २० धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर हार्दिकच्या ट्रोलिंगमध्ये आणखी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हार्दिक पांड्याच्या बचावासाठी धावून आला आहे. चाहत्यांनी हार्दिक पांड्याची टर उडवणं थांबवलं पाहिजे असं मायकल वॉनने म्हटलंय.

अवश्य वाचा - रोहित शर्माची शतकी इनिंग व्यर्थ, 20 रन्सनी चेन्नई ठरली 'सुपरकिंग'

हार्दिकची टर उडवण्यामागचं कारणच समजत नाही - वॉन

चाहते हार्दिक पांड्याची टर का उडवत आहेत हेच मला कळत नाहीये. गुजरातमध्ये पहिल्या सामन्यात हा प्रकार घडला, तेव्हा मी समजू शकतो...कारण दोन वर्ष हार्दिक गुजरातचा कॅप्टन होता. परंतु यानंतर तो हैदराबादला गेला, तिकडेही हाच प्रकार सुरु होता. मला तेव्हा असं वाटलं की हे नेमकं काय सुरु आहे.  यानंतर हार्दिक वानखेडे मैदानावर आला. तिकडेही मुंबईचे घरचे चाहते हार्दिकला ट्रोल करत होते. मला हे काहीच समजलं नाही. मायकल वॉन युट्यूबरील The Ranveer Show या कार्यक्रमात बोलत होता.

एकीकडे हार्दिक पांड्याचा फॉर्म खराब असताना त्याच्या जागेवर टी-20 वर्ल्डकपमध्ये शिवम दुबेला संधी देण्याची मागणी होत आहे. परंतु या परिस्थितीतही मायकल वॉनने हार्दिक पांड्यालाच आपला पाठींबा दिला.

Advertisement

अवश्य वाचा - धोनी, शास्त्री आणि वानखेडे! पुन्हा जागा झाला 13 वर्षांपूर्वीचा इतिहास, Video

...तर हार्दिक पांड्या भारतीय संघात हवाच !

भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की मुंबई इंडियन्सचे चाहते हे देखील भारताचेच चाहते आहेत. जर भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर त्यांना हार्दिक पांड्याची गरज लागणार आहे. यासाठी हार्दिक पांड्याने चांगलं खेळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मनात काहीही असलं तरीही पुढचे काही दिवस चाहत्यांना हार्दिक पांड्याला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. कारण हार्दिक पांड्या जर फॉर्मात असेल तर भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकायचे जास्त चान्सेस आहेत, असं वॉनने स्पष्ट केलं.

चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्याने अखेरची ओव्हर टाकली. ज्यात धोनीने तीन षटकार खेचले. चार बॉलमध्ये धोनीने काढलेल्या २० धावा सरतेशेवटी मुंबईच्या पराभवात निर्णायक ठरला. धावसंख्येचा पाठलाग करताना रोहितच्या फटकेबाजीमुळे मुंबईचा संघ काही क्षणापर्यंत सामन्यात विजयाचा दावेदार होता. परंतु मोक्याच्या क्षणी हार्दिक फलंदाजीतही आपली चमक दाखवू शकला नाही.

Advertisement

Topics mentioned in this article