Shreyas Iyer Admitted in ICU: ऑस्ट्रेलियाच्या सिडनी मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला. ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरीचा झेल घेत असताना श्रेयस अय्यर मैदानावर पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. आता श्रेयसच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Shreyas Iyer Injury Update)
श्रेयस अय्यरवर ICU मध्ये उपचार सुरु
भारताचा उपकर्णधार (Vice-Captain) आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) झेल घेताना मैदानात जखमी झाला असून, त्याच्या प्रकृतीबाबत अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे अय्यरला सिडनी येथील रुग्णालयाच्या 'आयसीयू' (ICU) विभागात दाखल करण्यात आले आहे.
सामन्याच्या ३४ व्या सामन्यात हर्षित राणा (Harshit Rana) गोलंदाजी करत असताना, ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक-फलंदाज ॲलेक्स कॅरी (Alex Carey) याने एक हवाई शॉट (Aerial Shot) मारला. या वेळी अय्यरने झपाट्याने विरुद्ध दिशेने धावण्यास सुरुवात केली. त्याने चेंडू पकडण्यासाठी हवेत उडी (Jump) मारली आणि झेल पकडण्यात तो यशस्वीही झाला.
Ind vs AUS T20 Schedule: वनडेनंतर टी20 चा थरार! कधी आणि कुठे रंगणार सामना? पाहा संपूर्ण वेळापत्रक
झेल घेताना झाला होता जखमी...
मात्र, झेल घेतल्यानंतर तो त्याच ठिकाणी घसरला आणि डाव्या बाजूला जोरत कोसळला. पडल्यानंतर अय्यरने तत्काळ आपल्या बरगड्या पकडल्या आणि वेदनेने कण्हू (Crying in Pain) लागला. एका बाजूला ॲलेक्स कॅरी बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तर दुसऱ्या बाजूला मैदानात पडलेला अय्यर वेदनेने तळमळत होता. लगेचच फिजिओ (Physio) मैदानात आले आणि तपासणी केल्यानंतर त्यांनी अय्यरला मैदानातून बाहेर नेले.
दरम्यान, या मालिकेत भारतीय खेळाडूंच्या दुखापतींनी टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेकीच्या वेळीच सांगितले होते की, नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) हे देखील दुखापतीमुळे सामना खेळत नाहीत. नितीशच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली आहे, तर अर्शदीपला स्नायूंच्या ताणामुळे (Cramps) त्रास होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world