Shryas Iyer's injury Health status:ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (SCG) झालेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याने घेतलेला 'सुपर कॅच' आता टीम इंडियासाठी मोठी आपत्ती ठरला आहे. कॅच घेण्याच्या प्रयत्नात मैदानावर आदळल्यामुळे श्रेयस अय्यरला बरगड्यांना (Rib Cage) गंभीर दुखापत झाली असून, त्याला सिडनी येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत अय्यरची 'प्लीहा' फुटल्याची अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे.
प्लीहा फुटल्याने अंतर्गत रक्तस्राव...
मैदानात कॅच घेण्यासाठी उडी मारताना श्रेयस अय्यर इतका जोरात जमिनीवर आदळला की, त्याच्या शरीराचा एक भाग बरगडीच्या खाली आला. यामुळे त्याची डावी प्लीहा (Spleen) फुटली, जी पोटाच्या डाव्या बाजूला मार लागल्याने होणारी एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती (Serious Medical Emergency) आहे. प्लीहा फुटल्यामुळे त्याला अंतर्गत रक्तस्राव (Internal Bleeding) सुरू झाला. ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर अय्यरची प्रकृती चांगली नव्हती. त्याचा रक्तदाब (Blood Pressure - BP) धोकादायक पातळीवर (Alarming Level) खाली आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Ind vs AUS T20 Schedule: वनडेनंतर टी20 चा थरार! कधी आणि कुठे रंगणार सामना? पाहा संपूर्ण वेळापत्रक
४८ तास महत्त्वाचे, ७ दिवस रुग्णालयात:
श्रेयस अय्यरला पुढील दोन दिवस (48 तास) आयसीयूमध्येच ठेवण्याची शक्यता आहे. मात्र, जर पुढील ४८ तासांत त्याचा अंतर्गत रक्तस्राव थांबला नाही, तर त्याला आणखी अनेक दिवस आयसीयूमध्ये राहावे लागू शकते. बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनुसार, अय्यरला किमान सात दिवस (Seven Days) तरी रुग्णालयातच घालवावे लागतील.
Medical update on Shreyas Iyer. Details 🔽 #TeamIndia | #AUSvIND https://t.co/8LTbv7G1xy
— BCCI (@BCCI) October 27, 2025
कुटुंबीय सिडनीला जाणार..
अय्यरची गंभीर स्थिती पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तातडीने कामाला लागले आहे. बोर्डाने अय्यरच्या कुटुंबाला घटनेबद्दल माहिती दिली असून, लवकरच कुटुंबातील एक सदस्य सिडनी येथे दाखल होईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.स्कॅनमध्ये अय्यरची प्लीहा फुटल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर आहे.
त्याची रिकव्हरी चांगली होत आहे. बोर्डाची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांच्या संपर्कात असून, त्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अय्यरच्या दुखापतीच्या प्रगतीची दररोज माहिती घेण्यासाठी भारतीय डॉक्टरांची टीम त्याच्यासोबत सतत राहणार आहे," असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world