मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर यावर्षी 13 मार्चला गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. गुजरातच्या डावातील 15 व्या षटकात मुंबई इंडियन्सने दिलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, वूमन्स प्रीमियर लीगच्या (WPL) अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी कोण भिडणार हे या सामन्यातून ठरणार होते. व्हाईट बॉल क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू नताली सायव्हर ब्रंट गुजरातच्या सिमरन शेखला गोलंदाजी करत होती. सिमरन आठव्या क्रमांकावर जीजीसोबत फलंदाजीसाठी आली होती. त्यावेळी गुजरातचा संघ संकटात सापडला होता. त्यांचे आठ फलंदाज 114 धावांवर बाद झाले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यावेळी असं नव्हतं की फक्त गुजरात जायंट्सचे चाहतेच चमत्कारासाठी प्रार्थना करत होते. खुद्द मुंबईतील धारावी या झोपडपट्टीत सिमरनचे कुटुंब आणि तिचे शेकडो चाहते श्वास रोखून तो सामना पाहत होते. शिवाय विजयासाठी प्रार्थना करत होते. 23 वर्षाच्या धारावीच्या मुली समोर ही एक मोठी संधी होती. तिच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. सिमरनने नताली सायव्हर-ब्रंटच्या षटकात दोन चौकार आणि एक शानदार षटकार ठोकला. तिच्या या धडाकेबाज खेळीमुळे धारावी आणि तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण आठ बॉलमध्ये 17 धावा करून ती बाद झाली. त्या दिवशी मुंबई इंडियन्सला हरवण्यासाठी ती फार काही करू शकली नाही. पण तिच्या छोट्या खेळीने ती मुंबईतील महिला क्रिकेट संघाची रॉकस्टार बनली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'लोकं सांगत होते हिचं खेळणं बंद करा' त्याच धारावी गर्लनं WPL मध्ये रचला इतिहास
धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. याच ठिकाणी सिमरनचा जन्म झाला. इथेच ती लहानाची मोठी झाली. याच सिमरन शेखने आता यशाचा झेंडा गाडला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिचं कौतूक होत आहे. एका इलेक्ट्रिशियनची मुलगी, जिने धारावीत गल्ली क्रिकेट खेळून क्रिकेट शिकले. तिने सर्व अडथळे पार करत जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसोबत खांद्याला खांदा लावून मैदाना गाजवले. डिसेंबर 2024 मध्ये सिमरन त्यावेळी चर्चेत आली, जेव्हा गुजरात जायंट्सने तिला डब्ल्यूपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये 1.9 कोटी रुपयांना खरेदी केले. त्या लिलावात ती भारतातील सर्वात महागडी अनकॅप्ड खेळाडू ठरली होती. सिमरनने एनडीटीव्हीला सांगितले, की "सुरुवातीला मला फक्त एवढीच अपेक्षा होती की कोणत्यातरी टीमने मला खरेदी करावे. पण जेव्हा किंमत एक कोटीच्या पुढे गेली तेव्हा मी आश्चर्यचकित आणि नि:शब्द झाले. अचानक माझ्या कठोर परिश्रमाला फळ मिळालं होतं. " असं तिने आवर्जून सांगितलं.
सिमरनची घरसी स्थिती तशी हालाकीची होती. सिमरन तिच्या सात भावंडांमध्ये तिसरी आहे. ती 11 लोकांच्या कुटुंबात वाढली आहे. त्यांच्याकडे धारावीत 10 बाय 16 फुटांची एक खोली आहे. धारावीतील लाखो इतर रहिवाशांप्रमाणे तिच्याकडेही नळाचे पाणी, स्वच्छता, चांगली आरोग्य सेवा, शिक्षण, कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक जागेची सोय नव्हती. मुंबईचा हा भाग अनेक समस्यांनी वेढलेला आहे. तिथे कचरा व्यवस्थापनासाठी काहीही नाही. शहराच्या या सर्वात वाईट भागात सिमरनने इतर अनेक धाडसी धारावीकरांप्रमाणे यशस्वी होण्याचा मार्ग शोधला. हे कौतूकास्पद म्हणाले लागेल.
सिमरनने एनडीटीव्हीला सांगितले की झोपडपट्टीत राहत असल्याने तिला कधीही तिच्यासमोर किती अडचणी आहेत याची जाणीव झाली नाही. तिला फक्त एवढेच माहित होते की, तिला क्रिकेट खूप आवडते. एक असा खेळ ज्यात तिला चेंडू शक्य तितक्या जोरात मारायचा होता. तिला चिंता फक्त एका गोष्टीची होती, ती म्हणजे मुलांनी तिला त्यांच्यासोबत खेळू द्यावे. याबाबतची आठवण ही ती सांगते. "लहानपणी मी नेहमी मुलांकडे विनंती करत असे की त्यांनी मला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू द्यावे. ते म्हणायचे की मला दुखापत होईल, पण मी त्यांना तोपर्यंत त्रास देत राहायचे, जोपर्यंत ते मला खेळायला देत नाहीत." ही बाब तिने आवर्जून सांगितली.
सिमरनच्या रक्तातच क्रिकेट होतं. तिचे वडील जाहिद अली शेख त्यांच्या तारुण्यात उत्कृष्ट गोलंदाज होते. 1990 च्या दशकात त्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. पण त्यांना परिस्थिती मुळे अधिक काळ खेळासाठी वेळ देता आला नाही. जाहिद म्हणतात, "माझं कुटुंब गरीब होतं. त्यावेळी लोक पैशांअभावी जेवण मिळालं नाही म्हणून बोलायचे. तसंच काहीसं माझ्या कुटुंबाचंही होतं. कुटुंबाला मदत करण्यासाठी मला कामधंदा सुरू करावा लागला. त्यामुळे मी क्रिकेट खेळणं सोडलं." असं त्यांनी सांगितलं. पण जेव्हा सिमरन क्रिकेट खेळताना धारावीच्या गल्ल्यांमध्ये लोकांच्या घरांच्या खिडक्या तोडू लागली. त्यावेळी तिचा एक दबदबा निर्माण झाला. क्रिकेटच्या मैदानावर तिच्यापेक्षा मोठ्या मुलांनीही तिला मान दिला. तेव्हा तिच्या पालकांनी तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. जावेद म्हणतात, "सिमरन नेहमी क्रिकेट खेळत असे. जेव्हा सिमरनबद्दल तक्रारी येऊ लागल्या, ती मोठे फटके मारून लोकांच्या खिडक्या तोडते. तेव्हा मला जाणीव झाली की तिच्यात एक असाधारण प्रतिभा आहे." त्यालाच आम्ही पाठींबा दिला.
सिमरनची आई अख्तरी बानो सांगतात "आमच्या समाजात मुलींनी क्रिकेट खेळणे सामान्य गोष्ट नव्हती. लोक सिमरनबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते. ते आमच्या संगोपनावरच प्रश्न उपस्थित करू लागले होते. पण माझे पती, मी आणि तिची भावंडे सिमरनचे स्वप्न पूर्ण करू इच्छित होतो. तिला क्रिकेट खेळायचे होते. तिला मदत करणे आमची जबाबदारी होती." सिमरनला काही असेही लोक भेटले ज्यांनी तिला साथ दिली. तिच्या खेळा बद्दल सर्वात आधी आरसी माहिम शाळेतील शिक्षिका पुष्पा यांनी पाहीला. सिमरनची आई म्हणते, "पुष्पा मॅडमने आम्हाला सिमरनला क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या की सिमरनला अभ्यास आवडत नाही, पण ती एक उत्कृष्ट खेळाडू बनू शकते." सिमरनने इयत्ता 10 वी नंतर शिक्षण सोडले आणि पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.
IPL 2025: मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर! जसप्रीत बुमराह कमबॅकसाठी सज्ज; पाहा धमाकेदार VIDEO
त्यावेळी पैशांची समस्याही एक मोठा अडथळा होती. पण इथेही लोकांनी मदत केली. त्याबाबत जाहिद सांगतात, "एका स्पोर्ट्स शॉपच्या मालकाने पाहिले की मला सिमरनसाठी क्रिकेट किट खरेदी करण्यासाठी 1500 रुपये कमी पडत आहेत, तेव्हा त्याने मला तेवढ्याच पैशात किट दिले, जेवढे पैसे माझ्याकडे होते." सिमरनच्या कुटुंबाची कहाणी धारावीतील लाखो रहिवाशांसारखीच आहे. तिचे आजोबा तैयब अली 1965 मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून कामाच्या शोधात मुंबईला आले होते. त्यांनी धारावीत स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी छोटी-मोठी कामे केली. जाहिदलाही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला. सिमरनच्या असामान्य क्रिकेट प्रतिभेमुळे आज 60 वर्षांनंतर कुटुंबाचे भाग्य पालटले आहे.
Kajal Atpadkar: माणदेशी कन्येची यशस्वीझेप! आई-वडील ऊसतोड कामगार, लेकीची भारताच्या हॉकी संघात निवड
धारावी ते WPL पर्यंत सिमरनचा प्रवास असामान्य आहे. धारावीत टॅलेंटने भरलेल्या आहे. व्यवसाय ते उत्पादन, संगीत, नृत्य, क्रिकेट आणि अगदी शैक्षणिक क्षेत्रातही धारावीकरांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. खरं तर मुंबईसह भारतातील हजारो झोपडपट्ट्या आपल्याला अनेक सिमरन शेख देऊ शकतात. पण आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुरेसा प्रयत्न करत आहोत का? भारतातील कोट्यवधी झोपडपट्टीवासीयांचा देशाच्या प्रगतीमध्ये समान वाटा आहे. पण बहुतेक वेळा त्यांना त्या सुविधा मिळत नाहीत. ज्यांचे ते हक्कदार आहेत. निश्चितच ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे.
आज मीडिया धारावीतील सिमरन शेखच्या घरी जमला आहे. 15 मिनिटांसाठी का होईना, धारावीतील या 'लपलेल्या प्रतिभे'चा उत्सव साजरा केला जात आहे. पण जे अत्यंत महत्त्वाचे आहे ते म्हणजे या समर्थनाला संस्थात्मक स्वरूप देणे,गरजेचे आहे. जेव्हा आम्ही सिमरनला विचारले की ती तिच्या 1.9 कोटी रुपयांचे काय करणार, तेव्हा तिने फक्त एवढेच म्हटले, "एक मोठे घर खरेदी करायचे आहे. कुटुंब अनेक वर्षांपासून एका मोठ्या घराचे स्वप्न पाहत आहे." सिमरनला माहित आहे की तिने संघर्ष करत एक यशाचा मार्ग शोधला आहे. ती म्हणते, "मला धारावीतील इतर मुलींना सांगायचे आहे की, त्या काहीतरी मोठे करू शकतात. त्यांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे आणि ते नक्कीच साकार होतील."