जाहिरात

Kajal Atpadkar: माणदेशी कन्येची यशस्वीझेप! आई-वडील ऊसतोड कामगार, लेकीची भारताच्या हॉकी संघात निवड

Kajal Atpadkar Selected In Hockey Team: दुष्काळावर मात करत केलेल्या कष्टाच चिज झाल आणि तिची भारताच्या हॉकी संघात निवड झाली आहे

Kajal Atpadkar: माणदेशी कन्येची यशस्वीझेप! आई-वडील ऊसतोड कामगार, लेकीची भारताच्या हॉकी संघात निवड

राहुल तपासे, प्रतिनिधी सातारा:

Kajal Atpadkar Success Story: ऊस तोड कामगार म्हंटले की या पालवरुन त्या पालावर.  या ऊसतोड कामगारांच्या मुलांचही आयुष्य असच बिना शिक्षणाच. मंग काय या मुलांची वयाच्या अगोदर लग्न होतात आणि त्यांना संसारासाठी ऊसांच्या फडातील फेऱ्यात अडकवले जाते.  मात्र एक मुलगी अशी आहे की तिने आपल्या जिद्दीचा एक इतिहासच घडवला, ती कन्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील काजल आटपाडकर. दुष्काळावर मात करत केलेल्या कष्टाच चिज झाल आणि या माणदेशी कन्येची भारताच्या हॉकी संघात निवड झाली आहे. वाचा हा खास रिपोर्ट.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणजे माण तालूका. याच माण तालूक्यातील वरकुटे-मलवडी गावाजवळील माळरानात असलेली पाटूलकीची वाडी.  गावात जेमतेम घरं.  नजर जाईल इतकी प्रत्येकाची जमिन मात्र पावसापाण्यामुळ या जमिनीवर धड कुसळही व्यवस्थित उगवत नाहीत. याच दगड धोंड्यांच्या गावातली काजल आटपाडकर. सात बहिणी भावंड. ही नवरा बायको ऊसतोड कामगार म्हणून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात भटकंत असायची. घराला टाळ ठोकून वणवण या गावातून त्या गावातला यांचा प्रवास सुरु असायचा.

या भावंडामधील काजल ही पाचवी मुलगी.  या मुलीची बालपणातली चपळाई आणि हुशारी चंद्रकांत जाधव आणि संगिता जाधव या शिक्षक दांपत्यांनी ओळखली आणि त्यांनी काजलला आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. शिक्षणातील प्राविण्य दिसता दिसता तिच्या शरिरातील चपळाई या शिक्षकांनी हेरली. तिला विविध स्पर्धात सहभागी करुन घेतले...गाव पातळीवरच्या स्पर्धा जिंकता जिंकता, ती तालूका- शहर आणि जिल्हा पातळीवरच्या स्पर्धांमध्ये पुढ सरकत गेली. अखेर तिने हॉकीची निवड केली.

नक्की वाचा - Amit Gorkhe News: 'खोटारडेपणाचा निषेध...', मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आमदार अमित गोरखेंचा संताप

हॉकीतील उत्कृष्ट खेळामुळे तिची भारताच्या टिममध्ये निवड झाली. तिच्या सहभागान काजलचे आई वडिल भारावलेत. काजलच्या आई वडिलांचे शिक्षण झाले नाही. लिहिता वाचताही येत नाही.  त्यामुळे या खेळाची पुसटशी कल्पनाही नाही. फक्त मुलगी कोणतातरी खेळात काहीतरी चांगल करते एवढंच.  काजलच्या या यशामागे शिक्षक दांपत्य असल्याचे तिचे आई वडिल सांगतात. गावा पासून काही अंतरावर असलेल्या शाळेतल्या शिक्षकांनी तिच भवितव्य घडवले.

 काजल भारताच्या हॉकी संघातील कोअर टिममध्ये आहे. ती लवकरच आता भारताच्या टिममधून खेळताना दिसेल. तिचे ध्येय हे याच दुष्काळाच्या मातीतून खेळात नाव लौकीक मिळवलेल्या धावपट्टू ललिता बाबर, आर्चरी प्रवीण जाधव यांच्या सारखे आपला झेंडा फडकवायचा आहे..... काजलच्या या ध्येयाला एनडीटीव्हीच्याही शुभेच्छा.

Maharashtra Politics: भाजपला 'खोचक' शुभेच्छा, मराठीवरुन मनसेलाही डिवचलं; उद्धव ठाकरे काय म्हणाले?