
IPL 2025: रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये लढत होत आहे. या सामन्यात डावाची सुरुवात करताना, केएल राहुलने 65 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 112 धावा केल्या. के एल राहुलच्या या वादळी शतकामुळेच दिल्लीच्या संघाने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातविरुद्ध केएल राहुलचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. या सामन्यात राहुलने डावाची सुरुवात केली आणि एक दमदार शतक ठोकले. केएल राहुलने 60 चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे आयपीएलमधील पाचवे शतक आहे. गुजरातविरुद्ध राहुलने 65 चेंडूत 112 धावांची खेळी केली. राहुलने 14 चौकार आणि 4 षटकार मारले. राहुलच्या स्फोटक खेळीमुळे दिल्लीने प्रथम खेळत गुजरातला 200 धावांचे लक्ष्य दिले.
या सामन्यात केएल राहुलने 33 धावा करताच त्याने इतिहास रचला आणि भारतासाठी 8 हजार टी-20 धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनला. या दरम्यान, केएल राहुलने हा विक्रम असलेल्या विराट कोहलीला मागे टाकले. केएल राहुल हा टी-20 क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा गाठणारा सहावा भारतीय आहे. या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
Fifth IPL hundred from the bat of the beast 🥵 pic.twitter.com/Rl1YpMJBdW
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 18, 2025
केएल राहुलने 8000 टी 20 धावा पूर्ण करण्यासाठी 224 डाव घेतले, तर विराट कोहलीने हा टप्पा गाठण्यासाठी 243 डाव घेतले. यासह, केएल राहुल टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 8 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे बाबर आझम आणि ख्रिस गेल आहेत. या यादीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे, ज्याने 213 डावांमध्ये ही कामगिरी केली. तर बाबर आझमने 218 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
Beed News: मारहाण प्रकरणाने नागरिकांचा संताप! परळीसह विविध ठिकाणी बंदची हाक; 4 मोठ्या मागण्या केल्या
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world