
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धदिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्सने 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने गुजरातला 200 धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने 19 व्या ओव्हरमध्ये एकही गडी गमावता विराट विजय मिळवला. गुजरातकडून साई सुदर्शनने शानदार शतकी खेळी केली तर त्याच्यासोबतच शुभमने गिलने 93 धावांची अर्धशतकी खेळी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामन्यात दिल्लीच्या संघाने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचे सलामवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिलने तुफानी खेळी करत संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. या दोन्ही खेळाडूंनी दिल्लीच्या गोलंदाजावर हल्ला चढवत शानदार अर्धशतके झळकावली. त्यामुळेच हा सामना एकतर्फी होतो की काय? असे चिन्ह दिसत आहे. या दोन्ही सलामवीरांनी पहिल्यापासून दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत अखेर संघाला विजय मिळवून दिला. साई सुदर्शनने नाबाद 108 धावांची खेळी केली ज्यामध्ये त्याने 12 चौकार आणि 4 षटकार लगावले तर 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने शुभमन गिलने 93 धावा केल्या.
तत्पुर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात संथ झाली. मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकात राहुलने दोन चौकार मारले परंतु चौथ्या षटकात मिड-ऑनवर अर्शद खानला सिराजकडे झेप देण्यापूर्वी फाफ डु प्लेसिसला 10 चेंडूत फक्त पाच धावा करता आल्या. चार षटकांत दिल्लीचा स्कोअर एका विकेटसाठी 19 धावा होता. त्यानंतर आलेल्या के एल राहुलने तुफानी खेळी केली.
राहुलने 65 चेंडूत चार षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 112 धावा केल्या. त्याचबरोबर अभिषेक पोरेल (30) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 90 आणि कर्णधार अक्षर पटेल (25) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. यामुळे दिल्लीला संथ सुरुवातीतून सावरण्यास आणि मजबूत धावसंख्येचा पाया रचण्यास मदत झाली.
KL Rahul Century: केएल राहुलची 'क्लास' शतकी खेळी! किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world